प्रसंगावधानामुळे वाघाच्या हल्ल्यातून बचावले दुचाकीस्वार!
समांतर क्रांती / जांबोटी प्रंसगावधानामुळे वाघाच्या संभाव्य हल्ल्यातून दुचाकीस्वार बालंबाल बचावल्याची घटना तळावडे-गोल्याळी मार्गावर घडली. तोराळी येथील जेसीबी मालक आकाश पाटील आणि जेसीबी चालक प्रदीप चव्हाण अशी या दुचाकीस्वारांची नावे आहेत. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, शुक्रवारी रात्री आठच्या सुमरास आकाश आणि प्रदीप हे तोराळीकडे निघाले असता रस्त्यात त्यांना मुक्त संचार करणाऱ्या वाघाचे दर्शन घडले. […]