समांतर क्रांती विशेष कणकुंबी: दोन वर्षांपासून रस्त्याच्या मागणीसाठी चोर्ला महामार्ग रोखणारे मान गावचे नागरीक कुणाला आठवत नसतीलच! का आठवतील? त्याच नागरीकांनी शहरातून उनाडक्या करण्यासाठी आलेल्यांना समजूतीच्या चार गोष्टी सांगितल्या तर त्या रूचत नाहीत. त्यांची बाजू घेऊन शासन-प्रशासनाशी भांडावं असं तरूणाईला का वाटत नाही? चला तर मग थेट जाऊ या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी चक्क मान या […]
समांतर क्रांती वृत्त लोंढा: वन परिक्षेत्रातील राजवाळ-गवळीवाड्याच्या परिसरात गेल्या कांही दिवसांपासून एका बिबट्याने ठाण मांडले आहे. कांही नागरीकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न त्याने केल्याने परीसरात भितीचे वातावरण आहे. वनविभागाने त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. गावापासून जवळच झाडीत हा बिबट्या वावरत असून तो राजरोसपणे संचार करीत आहे. लोकांची चाहूल लागल्यानंतर तो प्रचंड ओरडत आहे. तसेच हल्ल्याचा […]
खानापूर:कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना तालुका खानापूर घटक पदाधिकारी व जेष्ठ नागरिकांची बैठक उद्या सोमवारी सकाळी 11 वाजता ज्ञानेश्वर मंदिर खानापूर येथे बोलाविली आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.मिटींगचे विषयविश्व योगा दिन साजरा करणेबाबत योगाचे योग गुरु श्रीयुत अरविंद कुलकर्णी खानापूर यांचे मार्गदर्शनाखाली होणार आहे.पुढील सहामाही कार्यक्रमाचे नियोजन करणे.
संडे स्पेशल/ चेतन लक्केबैलकर खानापूर: भौगोलिक सलगता असतांनाही खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटाला बेटांचे स्वरूप येते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांनाही या भागात अजून मुलभूत सुविधा पोहचलेल्या नाहीत. पावसाळ्यातील नागरीकांचे जीवन सर्वसामान्यांच्या अंगावर काटे उभे करते. अदिवासी जमातींपेक्षाही भयावह वाटेल, असं येथील जीवनमान आहे. नेमीची येतो पावसाळा आणि त्याबरोबर तालुक्याच्या पश्चिम घाटातील समस्याही चर्चेत येतात. उन्हाळा […]
समांतर क्रांती वृत्तबंगळूर: म्हादईवरील कळसा-भांडुरा प्रकल्पासाठी काँग्रेस सरकारने अर्थसंकल्पात एक हजार कोटींची तरतूद केली आहे. मागीलवेळी भाजपने ५०० कोटींची तरतूद केली होती. एकंदर, प्रत्येक सरकार म्हादई प्रकल्पासाठी निधीचा पाऊस पाडण्याच्या तयारीत आहे. गोव्यातील सरकारने मात्र आतापर्यंत एक थेंबही पाणी वळवू देणार नसल्याच्या केवळ घोषणाच चालविल्या आहेत.
समांतर क्रांती वृत्त खानापूर: जमिनीच्या वादातून चिगुळे येथे झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात ३५ जणांना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने सशर्त जामिन मंजूर केला आहे. माउली मंदिर आणि देवस्थानाची जमिन यावरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. दि. ५ जूनरोजी त्याचे पर्यावसान मारामारीत झाले होते. मुख्य संशयीत चौगुले याच्यासह अन्य ३४ जणांनी घरावर हल्ला करून मारहाण केल्याची फिर्याद […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: जुलैच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यात केवळ ७८.८ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. जून दहाला मान्सून तालुक्यात पोहचला तरी पावसाच्या तुरळक शिडकावा सोडला तर महिनाभरात एकदाही मुसळधार कोसळलेली नाही. जुलैच्या पहिल्या आठवड्यात तरी दमदार पाऊस होईल अशी तालुकावासीयांची आशा होती. तीदेखील धुळीला मिळाली आहे. तालुक्यात सुमारे ३० हजार हेक्टरमध्ये भात पिक घेतले जाते. त्यातील […]
समांतर क्रांती विशेष अर्धा डझन नद्या आणि डझनभर नाल्यांचा उगम असणाऱ्या खानापूर तालुक्यातील धबधबेही तेवढेच विलोभनीय आणि पर्यटकांना आकर्षित करणारे आहेत. खानापूर शहरापासून आवघ्या चार कि.मी. अंतरावर असणाऱ्या बाचोळी धबधब्यालाही आता पर्यटक हमखास भेटत देत आहेत. कुंभार नाल्यावर असणाऱ्या कर्नाटक जलसंधारण खात्याच्या तलावातून कोसळणारा हा धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. खानापूर येथे मलप्रभा नदीला मिळणाऱ्या […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: ‘खुर्ची’साठी धडपडणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांनी तालुकावासीयांचे मनोरंजन चालविले आहे. येथील क्षेत्रशिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची यांच्या जागी बेळगावचे वाय.के.बजंत्री यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले होते. १ जूनला आदेश देण्यात आल्यानंतर सोमवारी (ता.०३) ते तात्काळ रुजू झाले. पण, याच काळात श्रीमती कुडची यांनी कर्नाटक राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागितली. त्यामुळे त्यांनीही येथील ताबा सोडला नाही. बुधवारी […]