नंदगड: बसची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील चार जण जखमी झाल्याची घटना दीडच्या सुमारास बिडीजवळ घडली. यामध्ये कर्तनबागेवाडी येथील भिमाप्पा व्हन्नुर, यल्लप्पा व्हन्नुर, पल्लवी व्हन्नुर, ऐश्वर्या व्हन्नुर हे जखमी झाले असून यातील दोघांची स्थिती चिंताजनक आहे. व्हन्नुर कुटुंबीय बिडीहून कर्तन बागेवाडीला जात असताना गोल्लीहळीजवळच्या वळणावर हल्याळहुन खानापूरकडे येणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसने दुचाकीला जोरदार धडक […]
महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटक आणि इतर राज्यातील छत्रिय मराठा समाज विखुरला आहे. तो आजही एकसंघ नाही. विशेषत: कर्नाटकातील मराठा समाज विविध भागात आहे. त्यांची नाळ आजही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेशी जोडली गेली आहे. त्यांच्या संस्कृतीतून ती नेहमीच अधोरेखीत होत असते. कर्नाटकातील मराठा समाज एकवटला पाहिजे. तो एकवेळ अल्पसंख्य असला तरी चालेल, पण राज्यात मराठ्यांना सोयी-सुविधा मिळाल्या […]
जिद्द असे तर सर्व कांही सिध्द करता येतं. अर्थातच त्यासाठी कठोर मेहनत घेत सातत्य टिकवून ठेवण्याची गरज ही असतेच. ताकद ही केवळ आपल्या दंडात असून चालत नाही. तर ती आपल्या आचार-विचारातून सुध्दा दिसली पाहिजे. इच्छाशक्तीच्या जोरावर अत्यंत कमी वयात यशाचे गाठणारे विकास मोहनराव देसाई हे असेच एक व्यक्तीमत्व ज्यांनी तालुक्यातील तरूणांसमोर आदर्श ठेवला आहे. आज […]
खानापूर: तालुका कुस्तीगीर संघटनेने आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्यात महान भारत केसरी सिकंदर शेखने (मोहोळ) हरयाणा केसरी विशाल भोंडू याला दुहेरी पट काढत अस्मान दाखविले. रात्री सव्वानऊ वाजता लागलेल्या या कुस्तीचा निकाल आवघ्या तेरा मिनिटात लागला. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत संदिप मोटे (सांगली) याने मुधोळच्या सुनिल फडतरेचा पोकळ घिस्सा डावावर पराभव करून कुस्तीशौकीनांची वाहवा मिळविली. तिसऱ्या क्रमांकाच्या […]
खानापूर: निट्टूरजवळ दुचाकीची रस्त्याच्या कड्याला धडक बसून एकजण जागीच ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी घडली. योगेश महादेव मन्नुरकर (वय ३८) हा जागीच ठार झाला तर नारायण केदारी कर्लेकर (वय ५५,दोघेही रा.बाबली गल्ली, अनगोळ-बेळगाव) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना बेळगावमधील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, योगेश हा […]
बेळगाव: मुलीचे लग्न आवघ्या सहा दिवसांवर असतांना वडिलांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने गर्लगुंजी गावावर शोककळा पसरली आहे. अरूण मष्णू पाटील (वय ४५, रा.गर्लगुंजी) असे त्यांचे नाव असून गुरूवारी लग्नपत्रिका वाटून घरी परततांना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने ठोकरल्याची घटना सुळगा येथे घडली. घरात लगिनघाई सुरू होती. लग्न अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपल्याने अरूण हे नातेवाईकांना पत्रिका […]
स्पॉटलाईट / चेतन लक्केबैलकर आई-वडिलांचा विरोध डावलून आधी पळून जाऊन प्रेमविवाह केला. दोन मुलं झाली. पण, कांही वर्षातच पुन्हा दुसरे सावज जाळ्यात सापडताच पोटच्या गोळ्यांना पतीच्या हवाली करून पत्नीने प्रियकरासोबत धूम ठोकली. अगदी चित्रपटाच्या पटकथेला साजेल अशी घटना खानापूरपासून जवळच असणाऱ्या एका खेड्यात घडू शकते, यावर नक्कीच कुणाचा विश्वास बसणार नाही. पण, हे घडलंय. तेही […]
खानापूर: सावरगाळी परिसरात दोन वाघांचे वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आनंदगड जंगल भागात वाघांच्या डरकाळ्या ऐकू येत होत्या. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. म.ए.समिती नेते नारायण कापोलकर हे सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास शेतकाम करीत असताना दोन वाघ आनंदगडावर जाताना त्यांच्या दृष्टीस पडले. सध्या वाघांच्या मिलनाचा हंगाम असल्याने या दोन वाघांनी परिसरात […]
बंगळूर: विशेष अधिवेशनाच्या आजच्या पहिल्यादिवशी विधानसभेच्या आमदारांनी शपथ घेतली. खानापूरचे भाजप आमदार विठ्ठल हलगेकर कोणत्या भाषेत शपथ घेणार याकडे खानापूर तालुकावासीयांचे लक्ष लागून राहिले होते. पण, त्यांनी तालुकावासीयांची घोर निराशा केली. कन्नडमध्ये शपथ घेणारे ते तालुक्याचे दुसरे आमदार ठरले. यापूर्वी काँग्रेसच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी कन्नडमधून शपथ घेत माय मराठीला हरताळ फासला होता. आता […]
जांबोटी: शेतात काम करीत असताना दोन अस्वलांनी महिलेवर हल्ला केल्याची घटना आज शनिवारी सकाळी हब्बनहट्टी येथे घडली. रेणुका इराप्पा नाईक (वय 60) असे अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव असून तिच्यावर बेळगाव येथील इस्पितळात उपचार सुरू आहेत. सादर घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.