चेतन लक्केबैलकर सीमाप्रश्न ही केवळ भाषेसाठीची लढाई नाही, धगधगणाऱ्या अग्नीकुंडातील तो अस्मितेचा वनवा आहे. निवडणुकीत हरल्याने हा वनवा विझेल, असा अंदाज बांधून बेताल वक्तव्य करणे हा हलकटपणा आहे. बेळगावच्या तीन जागांसह खानापूर आणि यमकनमर्डीतील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवाला सर्वसामान्य मराठी भाषिकांना जबाबदार धरले जात आहे. त्यात चुक कांहीच नाही. तरीही नेत्यांचा मस्तवालपणा आणि गावगन्ना पुढाऱ्यांची […]
आकरा जागांवर विजय; भाजपला धक्का बेळगाव: काँग्रेसने पुन्हा भाजपचा उधळलेला सत्तावारू राखत संपूर्ण राज्यात भाजपचा धुव्वा उडविला. बेळगाव जिल्ह्यातदेखील १८ पैकी ११ जागांवर काँग्रेसने दणदणीत विजय मिलविला. मागील विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील १८ पैकी १३ जागांवर भाजपने वर्चस्व मिळविले होते. ऑपरेशन कमळच्या वेळी आणखी तीन आमदारांनी भाजपचा रस्ता गाठला होता. त्यामुळे काँग्रेसकडे केवळ पाच आमदार […]
विशेष/चेतन लक्केबैलकरखानापूर तालुक्यातील जनता जेवढी संहिष्णू आहे, तेवढीच भित्रीही आहे,हे वारंवार सिध्द झाले आहेच. पण, लाचारीचा डाग येथील मतदारांना कधी लागला नव्हता. २०१३ आणि आताच्या २०२३ च्या निवडणुकांमध्ये मात्र तालुक्यातील मतदारांनी लाचारी पत्करल्याचे दिसून आले. विकासाच्या जोरावर आपण सहज निवडून विधान सभेचे तख्त काबिज करू असे छातीठोपणे सांगणाऱ्या राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांनी दौलतजादा का केली? कारण, […]
संवाद / चेतन लक्केबैलकरसीमाप्रश्नाची सोडवणूक हाच आमचा मूळ आजेंडा आहे. खानापूर तालुक्यातील मराठी भाषा आणि संस्कृती टिकविण्यात समितीने ऐतिहासिक योगदान दिलेले आहे. कुप्पटगिरीचे नागापण्णा होसुरकर यांनी हौतात्म्य पत्करले. सुमारे ५०० हून अधिक सत्याग्रहींनी त्यांच्या संसारावर तुळशीपात्र ठेऊन तुरूंगवास भोगला. सीमाप्रश्न हा ६६ वर्षे इतका प्रदीर्घ काळ चाललेला हा जगातील एकमेव लढा म.ए.समितीने टिकऊन ठेवला आहे. […]
खानापूर: काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविणाऱ्या म.ए.समिती कार्यकर्त्यांना पोलिसांनी गर्लगुंजीत अटक केली. अशोक चव्हाणांना समिती उमेदवाराच्या विरोधात प्रचार करू नये असे आवाहन करण्यात आले होते.तरीही त्यांनी समितीचा बालेकिल्ला असलेल्या गर्लगुंजी येथे रोड शो करून मतयाचना करण्याचा प्रयत्न केला. गेल्या कांही दिवसांपासून भाजप आणि काँग्रेसच्या महाराष्ट्रातील […]
शंकर गावडा यांचे आवाहन; निलावडे भागात म.ए.समिती प्रचाराचा धडाका खानापूर: सीमाभागातील मराठी भाषा आणि संस्कृती संपविण्याचा घाट राष्ट्रीय पक्षांनी घातला आहे. त्याला महाराष्ट्रातील भाजप आणि काँग्रेसचे नेते खतपाणी घालत आहेत. ही धोक्याची घंटा असून मराठी वाचविण्याची जबाबदारी सर्वस्वी आपल्यावर आली आहे. अशावेळी कर्नाटकाच्या विधानसभेत मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी मराठीचे प्रतिनिधी म्हणून मुरलीधर पाटील यांना […]
खानापूर: पुंडलिक आत्माराम सावंत (वय 62) यांचे आता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी गुंजी, नागरगाळी,हलकर्णी ग्रामपंचायत मध्ये सेक्रेटरी म्हणून काम केले होते. हलकर्णी ग्रामपंचायत मधून ते 5 वर्षापुर्वी सेवानिवृत्त झाले होते.ते काही काळ पत्रकार म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून नातवंडे असा परिवार आहे.भावपूर्ण श्रद्धांजली 💐
खानापूर: तालक्यातील हेब्बाळ आणि लालवाडी येथे म.ए.समिती कार्यकर्त्यांनी उमेदवार मुरलीधर पाटील यांचा घरोघरी जाऊन प्रचार केला. तसेच कोपरा सभा घेऊन मतदानाचे आवाहन केले. दोन्ही गावातील मराठी भाषिकांनी समितीच्या पाठीशी असून मुरलीधर पाटील यांना बहुमतांने विजयी करण्याचा निर्णय जाहीर केला. तालुक्यातून समितीच्या प्रचाराला उस्त्फूर्द प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रातील नेत्यांच्या सभांमुळे मराठी भाषिकांमध्ये चैतन्य पसरले असून यावेळी […]
भाजपचे नेते लुच्चे-लफंगे; मुरलीधर पाटलांच्या प्रचार सभेला उदंड प्रतिसाद खानापूर: शिवसेनेने सीमाप्रश्नासाठी रक्त सांडले आहे. त्यामुळे आम्हाला सीमावासीयांच्या वेदनांची जाणिव आहे. हा भाग महाराष्ट्रात समाविष्ठ व्हावा, यासाठी शिवसेना आनि राष्ट्रवादी हे दोनच पक्ष संवेदनशील आहेत. बाकी कुणाला सीमावासीयांबाबत प्रेम नाही. सीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभागात शिवसेना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी ठामपणे उभी असून आताच्या निवडणुकीत मुरलीधर पाटील […]
मुरलीधर पाटलांच्या प्रचारासाठी ५१ हजारांची देणगी नंदगड: हलगा येथे म.ए.समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांचे उस्त्फुर्द स्वागत करण्यात आले. गावातून समितीला सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यासाठी राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना गावात थारा दिला जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या गावाने नेहमीच समितीच्या पाठीशी ठामपणे उभे राहून समिती उमेदवाराच्या विजयात तसेच सीमाचळवळीत […]