समांतर क्रांती / खानापूर तीन महिन्यांपासून जळगे गावाच्या परिसरात ठाण मांडून लाखो रुपयांचे नुकसान केलेल्या टस्कराला जेरबंद करून त्याची शिमोगा जिल्ह्यातील सक्रेबैल हत्तींच्या शिबीरात रवानगी करण्यात आली. पण, एवढ्याने तालुक्यातील हत्ती समस्या सुटलेली नाही. अद्यापही गुंजी, नंदगड वनविभागात दोन कळपांनी उच्छांद मांडला आहे. खानापूर शहरापासून आवघ्या तीन कि.मी. अंतरावरील कौंदल येथे हत्तींच्या कळपाने सोमवारी (ता.१३) […]
बेळगाव : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची खानापूर म.ए.समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी गोवा येथे भेट घेतली. यावेळी दळवी यांनी, फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार असून या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधानांना माहिती द्यावी आणि सीमाप्रश्न लवकर सुटावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी […]
कारवार: उत्तर कन्नडचे खासदार विश्वेश्वर हेगडे- कागेरी यांच्या शिरसीतील घरात सोमवारी (ता.१३) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बिबट्यांने एन्ट्री मारली. कांही काळ बिबट्यांने आहाराचा शोध घेतल्यानंतर तेथून पळ काढला. खासदार कागेरी हे यावेळी घरात होते. रात्री घराच्या परिसरातील बागेतून बिबट्या घराच्या अंगणात आला. त्यांने कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न फसला. त्यामुळे कांही वेळाने […]
खानापूर: बेळगाव येथे २१ रोजी होणाऱ्या जय बापू, जय भीम, जय संविधान कार्यक्रमाच्या नियोजनासाठी गुरूवारपासून (ता.१६) तालुक्यातील प्रत्येक जिल्हा पंचायत मतदार संघात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी (ता.१६) सकाळी ११ वाजता पारिश्वाड, दुपारी ३ वाजता कक्केरी, शुक्रवारी (ता. १७) सकाळी ११ वाजता गर्लगुंजी, दुपारी ३ वाजता जांबोटी, शनिवारी (ता. १८) सकाळी ११ वाजता लोंढा […]
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील तोराळी येथील सीआरपीएफ कोब्रा कँपमधील कॉन्स्टेबल प्रदिपकुमार पांडे (वय ३६, रा. चंडीपूर-उत्तर प्रदेश) हे आज सोमवारी (ता.१३) सकाळी ६.३० वाजल्यापासून बेपत्ता आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते कोब्रा कँपमध्ये स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहेत. आज सकाळी ते अधिकाऱ्यांची परवानगी न घेता, कुणालाही न सांगता ते कँपमधून निघून गेले असल्याची फिर्याद उपनिरीक्षक प्रदिपकुमार […]
समांतर क्रांती / खानापूर तहसिलदारांवरील लोकायुक्तांचा छापा, त्यात मिळालेले घबाड आणि दुसऱ्याच दिवशी झालेली सर्व्हे विभागातील अधिकाऱ्यांवरील निलंबनाची कारवाई यामुळे महसूल खाते हादरले आहे. पण, अद्यापही कांही विभागातील कारभारात घोटाळे सुरूच आहेत. विशेष म्हणजे नोंदणी कार्यालयातील एजंटराज सुरूच असल्याने महसूल खाते कधी सुधारणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जाऊ तेथे खाऊ, अशी ‘इमेज’ करून […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर को-ऑप बँकेचे मतदान चुरशीने पार पडले. पण, निकाल कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. मतमोजणी १० ते पंधरा दिवसानंतर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार होईल, असे निवडणूक अधिकारी रविंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. सकाळपासून निर्धारित वेळेपर्यंत ७४ टक्के मतदान झाले. गेल्या महिनाभरापासून खानापूर को-ऑप बँकेच्या निवडणुकीचीच चर्चा सुरू होती. शेलारविरुध्द शेलार अशा लढतीच्या पार्श्वभूमीवर […]
खानापूर : येथील खानापूर को ऑप बँकेच्या निवडणुकीसाठी सकाळपासून चुरशीने मतदान सुरु आहे. दरम्यान, मतदारसह दोन्ही पॅनलच्या समर्थकांनी समर्थ इंग्रजी शाळेसमोर मोठी गर्दी केली आहे. सहकार आणि बँक विकास अश्या दोन पॅनलमध्ये ही लढत होत आहे. गेल्या महिनाभरापासून बँकेच्या निवडणुकीचे रान पेटले आहे. विशेष म्हणजे शेलार विरुद्ध शेलार अशी ही रंगतदार लढत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर को-ऑप बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळासाठी आज रविवारी (ता.१२) मतदान होणार आहे. विद्यमान संचालकांचे सहकार पॅनेल विरुध्द बँक विकास पॅनेल अशी झुंज होईल, यात कोण बाजी मारणार? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी चारपर्यंत मतदानाची प्रक्रीया पार पडेल, त्यानंतर मतमोजणी होणार असून उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. विद्यमान संचालकांच्या […]
समांतर क्रांती / खानापूर आम्ही बँकेच्या विकासासाठी धडपडत आहोत. त्यासाठी आम्ही विविध योजना राबवित आहोत. सभासदांना आम्ही करीत असलेल्या कामांवर विश्वास आहे, त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. विरोधकांना पराभवाची धास्ती असल्यामुळेच ते खोटे आणि बिनबुडाचे आरोप करून मतदारांची दिशाभूल करीत आहेत, असे मत विद्यमान चेअरमन अमृत शेलार यांनी समांतर क्रांतीशी बोलतांना केला आहे. बँकेत सुसज्ज […]