समांतर क्रांती न्यूज खानापूर: रामनगर रस्त्याच्या दुर्दशेचे कवित्व सात वर्षानंतरही संपेनासे झाल्याने अव्वाच्या सव्वा बाता मारणाऱ्या राष्ट्रीय नेतृत्वाचे नाक कापले गेले तरी भोके अजून शिल्लक असल्याचा अनुभव या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना येत आहे. उन्हाळ्यात धूळीने माखणाऱ्या प्रवाशांना पावसाळा सुरू झाल्यानंतर चिखलातून वाट काढावी लागत आहे. अपघातामुळे वाहन चालक पुरते हैराण झाले आहेत. आमदार विठ्ठल हलगेकर […]
खानापूर: अस्वलाने अचानक हल्ला करून जखमी केल्यानंतरही रक्तबंबाळ आवस्थेत एक कि.मी.चालत जाऊन घर गाठून जीव वाचविल्याची घटना बुधवारी रामनगर (ता.जोयडा) जवळील तिंबोली येथे घडली. या घटनेत विष्णू तानाजी शेळके (वय ७२, रा. म्हाळुंगे, ता.चंदगड) असे या जखमी गवळ्याचे नाव असून त्याच्यावर बेळगाव येथील इस्पितळात उपचार सुरू आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी, विष्णू हे त्यांच्या नातवाला […]
खानापूर तालुक्यातील पाच मराठी शाळा पटसंख्या कमी असल्याचे कारण दाखवून बंद करूनही शासनाचा कंडू शमलेला नाही. त्यानंतर आता एकशिक्षकी शाळांची जबाबदारी कानडी शिक्षकांवर सोपवून त्या शाळांचे कानडीकरण करण्याचा घाट शिक्षण खात्याने घातला आहे. तालुक्यातील घोसे बुद्रूक, सिंगिनकोप, गवसे,चिरेखाणी, सातनाळी, गंवेगाळी, बांदेकरवाडा, मेंडील या मराठी शाळांमधील कारभार यापुढे कानडी शिक्षक पाहणार आहेत. खरंतर या मराठी शाळांची […]
बेळगाव: 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारासाठी शेजारील गोव्यातून भाजप नेत्यांची फौज दाखल होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह पाच मंत्री आणि नऊ नेते प्रचारात सहभागी होणार आहेत.यावेळी भाजपने निवडणूक गांभीर्याने घेतली असून प्रचारात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत, यासाठी केंद्रीय कार्यकारिणी सतर्क झाली आहे. दरम्यान, निवडणूक प्रचारासाठी विविध राज्यातील नेत्यांना सूचना करण्यात […]
जोयडा: रामनगर हनुमान गल्ली येथील प्राथमिक हिरीय सरकारी शाळेत माध्यन आहार बनविणाऱ्या महिला बेजबाबदारपणे काम करीत होत्या, त्यांच्यामध्ये वारंवार होणारे वाद यामुळे मुलांना योग्य दर्जाचे अन्न मिळत नव्हते, मुलांसाठी असलेल्या अन्न धान्याचा दुरपयोग होत होता, त्यामुळे शाळेत जेवण बनविणाऱ्या तिन्ही महिलांना कामावरून काढले आहे, यामध्ये कोणालाही जातीवरून त्रास दिला नाही, अशी माहिती शाळा विकास आणि […]
जोयडा: आगामी विधानसभा निवडणुक कोणत्या पक्षातून लढविणार, यासंदर्भात माजी विधान परिषद सदस्य एस एल घोटणेकर यांनी लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रामनगर येथे केली. त्यात निवडणूक लढविण्यास आपण सज्ज असून या महिन्यात योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगत एस एल घोटणेकर कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.एस एल घोटणेकर यांनी रामनगर येथील […]
सुपा विस्थापितांच्या जमिनी 40 वर्षे पाण्याविना काळी नदीच्या पाण्याला उत्तर कर्नाटकाची वाट? बम्मू फोंडे/जोयडा पाण्याने समृद्ध असलेल्या शेत जमिनिंचा सुपा धरणासाठी त्याग केलेल्या विस्थापिताना रामनगर येथे जमिनी दिल्या आहेत , पण त्या जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी गेल्या 40 वर्षात पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही. त्यामुळे सुपा धरणाच्या पाण्यावर होणाऱ्या वीजनिर्मितीतून राज्याला उजेड देणाऱ्या रामनगर वासियांच्या […]