समांतर क्रांती / फोंडा दुचकीस्वारांना ठोकरून पळ काढलेल्या खानापुरातील टेंपो चालकास आज मंगळवारी (ता. २१) फोंडा पोलिसांनी अटक केली. तसेच अपघातास कारणीभूत ठरलेला मालवाहतूक टेंपोदेखील ताब्यात घेण्यात आला होता. या अपघातात एकजन ठार झाला होता. तर अन्य एकजण जखमी झाला आहे. गुरूवारी (ता.१६) राष्ट्रीय महामार्गावर दयानंदनगर-धारबांदोडा येथे सकाळी अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली होती. या […]
समांतर क्रांती / खानापूर जळगे येथे गेल्या दोन महिन्यांपासून हैदोस मांडलेल्या टस्कराला जेरबंद करून शिमोग्याला हलविण्यात वनखात्याला यश आले आहे. त्यासाठी शिमोगा येथील चार प्रशिक्षीत हत्तींचा वापर करण्यात आला. या मोहीमेत शिमोगा येथील ३० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. गेल्या दोन महिन्यांपासून टस्कराने जळगा गावाच्या भोवताली असलेल्या पिकांमध्ये धुडगूस चालविला होता. त्याला जंगलात हुसकावून लावण्याची मागणी […]
समांतर क्रांती / खानापूर लैला शुगर्सने यंदा ऊसाला प्रतिटन ३००० रुपये पहिला हप्ता जाहीर केला आहे. तसेच मागील गळीर हंगामातील थकीत ५० रुपये प्रतिटन हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती लैला शुगर्सचे चेअरमन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी दिली. लैला शुगर्सने यंदा दोन बॉयलर बसवून दुरूस्तीचे काम हाती घेतल्याने ऊस गाळपाला एक महिना उशिर […]
नंदगड : समांतर क्रांती न्यूज पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व लाभलेल्या नंदगड येथे भव्य शिवस्फूर्ती स्थळ उभारण्याचा निर्णय आजी माजी सैनिक आणि ग्रामस्थांनी घेतला आहे. या शिवस्फूर्ती स्थळावर भव्य असा सिंहासणाधिस्थित छ. शिवारायांचा पुतळा बसविण्यात येणार आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात नंदगड येथील ग्रामदेवता महालक्ष्मी देवीची यात्रा भरणार आहे. तत्पूर्वी शिवस्फूर्ती स्थळाचे उदघाटन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु […]
कुतूहल / समांतर क्रांती जीन्स वापरणे ही फॅशन बनली आहे. 80च्या दशकात जीन्सने भरतीयावर गारुड केले आणि पारंपारिक सुती कपडावर जणू संक्रात ओढवली. जीन्सच्या पॅन्ट अबाल-वृद्धांच्या आवडीची बनली आहे. लहान असो कि मोठे, प्रत्येकाच्या जीन्स पँटच्या उजव्या खिशात आणखी एक लहान खिसा असतोच. ही केवळ फॅशन आहे कि आणखी काय? जीन्सचा वापर रशिया आणि युरोपीय […]
प्रसंगावधान राखल्याने पत्नी बचावली समांतर क्रांती न्यूजजांबोटी : कणकुंबी वनपरीक्षेत्रातील माण गावात दोन अस्वलांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली. सखाराम महादेव गावकर (वय 63) असे त्यांचे नाव असून त्यांच्या पत्नी या हल्ल्यातून नशिबाने बचावल्या आहेत.याबाबतची अधिक माहिती अशी, सखाराम व त्यांची पत्नी गावापासून जवळच असणाऱ्या त्यांच्या शिवारात कामात व्यस्त होते. अचानक दोन […]
सिध्दापूर तालुक्यात डॉ. निंबाळकर यांचा प्रचार दौरा सिध्दापूर: विकासाकडे दुर्लक्ष करून केवळ विरोधकांवर तोंडसूख घेण्यात भाजपच्या नेत्यांना स्वारस्य आहे. त्यांना सर्व सामान्य जनतेच्या समस्यंशी कांही देणे-घेणे नाही. गेल्या दहा वर्षांपासून देशातील जनता ‘हिटलरशाही’ राजवट असल्याचा अनुभव घेत आहे. दहा वर्षांचा हा वनवास संपविण्यासाठी यावेळी जनतेने भाजपची गच्छंती निश्चित केली आहे, असा विश्वास काँग्रेसच्या उमेदवार डॉ. […]
मेस्ता मृत्यू प्रकरणावरून डॉ. निंबाळकर कडडल्या: दंगलीना कागेरीच जबाबदार कारवार: परेश मेस्ता या तरुणाच्या मृत्यूचे राजकारण करून तुम्ही आमदारकी मिळवली.तुम्ही गरिबांची घरे, दुकाने, सरकारी मालमत्ता जाळली. यात अनेक निष्पाप तरुण होरपळले, त्यांचे संसार उध्वस्त झाले. त्यावेळी तुम्ही मैदान सोडून पळाला. आता हे आगी लावण्याचे धंदे बंद करा, अशा शब्दात काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: चापगाव येथील रमेश तुकाराम पाटील यांच्या घरी चोरी झाल्याची घटना रात्री घडली. रमेश पाटील यांचे घर यडोगा रोडला घर आहे. ते काल कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते. रात्री अज्ञात चोरट्याने घराचा समोरील कुलूप तोडून घरात प्रवेश केला. आतील तिजोरी फोडून त्यातील दागिने व किमती वस्तू लंपास केल्या आहेत. पाळत ठेवून ही चोरी […]
समांतर क्रांती न्यूज खानापूर: तालुका म.ए.समितीची नुतन कार्यकारिणी निवडीसंदर्भात चर्चा करण्यासाठी सोमवार दि. 3 जुलै रोजी सकाळी ११ वाजता महत्वाची बैठक शिवस्मारकात बोलाविण्यात आली आहे. यावेळी पदाधिकाऱ्यांची निवड पारदर्शकपणे होणे आवश्यक असल्याने मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित राहून मते मांडावीत, असे आवाहन माजी आमदार दिगंबर पाटील आणि समितीचे निमंत्रक माजी ता.पं.सभापती मारूती परमेकर यांनी […]