गावगोंधळ / सदा टीकेकर जंगली जनावरांचे हल्ले वाढले की, आपण लगेच गळे काढू लागतो. पण, जेव्हा आपण त्यांची शिकार करतो. त्यांच्या अधिवासात अतिक्रमन करतो, तेव्हा ते बिचारे मुके जीव कुणाकडे त्यांचे गाऱ्हाणे मांडत असतील? कुत्र्यांनी हल्ले केली की लगेच कुत्र्यांना ‘कुत्ते की मौत’ देण्यासाठी सगळेच कसे ताणून उभे राहिलेत! कुत्र्यांची चुक आहेच म्हणा! त्यातही ती […]
गावगोंधळ / सदा टिकेकर सध्या राज्यात महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि आमदार सी.टी. रवी यांच्यातील राजकीय द्वंद्वामुळे वातावरण भलतेच तापले आहे. दोन्ही बाजुंनी एकमेकावर चिखलफेक आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. नुकताच मंत्री हेब्बाळकर यांनी भाजप दुतोंडी असल्याचा आरोप केला होता. तो किती तंतोतंत खरा आहे, याचे प्रत्यंतर दोनच दिवसात खानापूर भाजपच्या […]
गावगोंधळ / सदा टिकेकर आता साहित्य संमेलनांचा सुकाळ सुरू होईल. तसा तो झाला आहे. मराठीच्या संरक्षण आणि संवर्धनाची मक्तेदारी घेतलेल्यांनी त्यांच्या जिव्हांना आताश: धार लावली आहे. ते त्या पाजळण्यास तयार आहेत. समाज परिवर्तनाच्या (?) कार्यात ते आता कधी नव्हे ते गढून गेले आहेत. डिसेंबर महिन्यात गुलाबी थंडी साहित्यिक – साहित्यरसिकांच्या गालांवर लाली आणून जाते न […]
गावगोंधळ / सदा टिकेकर ‘आमच्या हातून तुमचे भले करणे शक्य नाही.’ असे सांगण्याचे धाडस राजकर्त्यांना होत नाही तेव्हा ते पळवाट शोधतात. त्यातून ते खरे तर स्वत:च्या अपयशाचे जाहीर प्रदर्शन करीत असतात. ‘आम्ही तुम्हाला आमुक देतो, तमुक देतो’ असे जाहीर करून गोगरिब लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. त्यातून त्या बिचाऱ्या नागरिकांच्या पुढच्या पिढ्यांची मसणात घेऊन जाण्याचाच त्या […]
गावगोंधळ / सदा टिकेकर बालवाडीची अंगणवाडी झाल्यापासून खानापूर तालुक्यात घोटाळ्यांनी जन्म घेतला. खरंतर लहान मुलांना अक्षर ओळख व्हावी, यासाठी अंगणवाडींची सुरूवात झाली. पण, तालुक्यातील राजकारण्यांनी घोटाळे करून या उपक्रमावर अगदीच ‘शि-सू’ करून घाण करून ठेवली आहे. आता राष्ट्रीय पक्षांची सत्ता तालुक्यात आल्यानंतर तरी ही परंपरा खंडीत होईल, असे वाटले असतांना भाजपच्या एका नेत्यांने ‘ना खाऊंगा, […]
गावगोंधळ / सदा टिकेकर जिल्हाधिकारी हे असे अधिकारी असतात, ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असते. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सुत्रे स्विकारल्यानंतर जो धडाका सुरू केला होता, त्यामुळे ते बेळगावकरांच्या कौतुकास पात्र ठरले. तसेच पोलिस आयुक्त याडा मार्टीन मार्बन्यांग यांनीही ज्या पध्दतीने महानगरातील कायदा-सुव्यवस्था सांभाळली आहे, त्याबद्दल त्यांच्याही धाडसाचे कौतुक होतांना दिसले. गेल्या १ नोव्हेंबरनंतर मात्र या […]
गावगोंधळ / सदा टीकेकर निवडणूक म्हटलं की, आरोप-प्रत्यारोप आलेच. पण, हे आरोप टीका-टीपण्णी करतांना कांही ताळतंत्र बाळगावे की नाही. सत्तेशी शय्यासोबत करण्याची इतकी घाई या नेत्यांना लागली आहे की ‘हागणाऱ्यास लाज की बघणाऱ्यास?’ असा प्रश्न शहाण्यासुरत्यांना पडतो. एक काळ होता, जेव्हा सर्वच पक्षाचे नेते (मग ते राष्ट्रीय, प्रादेशीक असो की गल्लीबोळातले टुकार नेते!) संयमाने जीभेवर […]
चर्चा वरवरच्या / सदा टीकेकर भाजप हा केवळ भटा-बामणांचा पक्ष असल्याचे कारवार लोकसभा मतदार संघातील एका महिलेने गाण्यातून मत व्यक्त केले आहे. भाजपचे विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्या प्रचारासाठी बनविण्यात आलेल्या या गाण्यात त्या महिलेने ब्राम्हणांनी एकत्र येऊन ब्राह्मण असणाऱ्या कागेरींना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. हे गाणे समाज माध्यमात व्हायरल केले जात आहे. प्रत्यक्षात संपूर्ण देशात […]
गावगोंधळ/ सदा टीकेकर लाखभर मते मिळाल्याचा आनंद क्षणभंगूर असतो. कारण, तेवढ्या लोकांच्या आपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. त्यांच्या आपेक्षा पूर्ण करतांना एखादा सक्षम आमदार किंवा खासदार त्या परिक्षेत पास होतो. पण, ज्यांची कुवत नाही त्यांचे काय? अगदी असाच प्रश्न सध्या तालुक्यावासीयांना पडून राहिला आहे. कालच्या घटनेवरून तर आमदार विठ्ठल हलगेकर यांची होती नव्हती, ती सगळीच गेली. […]
समांतर क्रांती/विशेष रिपोर्ट सह्याद्रीच्या खुशीत घनदाट झाडीत लपलेले चिगुळे. सुर्यास्ताचे विलोभनीय दर्शन घडविणारे खानापूर तालुक्यातील लक्षवेधी ठिकाण. महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या हद्दीवर वसलेल्या या गावातील माऊली देवीमुळे तिन्ही राज्यांचे ॠणाणुबंध जुळले आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक, भाविक गावाला भेट देतात. तेथील निसर्गसौदर्य इतके विलोभनीय आहे की, प्रत्येकजण तेथील आठवणी सोबत घेऊनच जातो.चिगुळेचे तोंड भरून कौतुक न […]