समांतर क्रांती / कारगिल विजय दिवस विशेष खानापूर: हा तालुका मुळातच शौर्याची गाथा सांगणारा आहे. येथील अनेकांनी विविध क्षेत्रात चमकदार कामगिरी करून तालुक्याचे नाव देशाच्या नकाशावर कोरले आहे. अलिकडे स्वातंत्र्योत्तर काळातही येथील अनेकांनी सैन्यदलात सेवा बजावतांना देशासाठी बलिदान दिले आहे. आज कारगिल विजय दिन. यानिमित्ताने अशाच एका धिरोदात्त वीर सैनिकाची शौर्यगाथा मांडत आहोत.. ..आणि त्यांनी […]
समांतर क्रांती खानापूर: दहा बाय दहाचे चहाचे दुकान. त्यात दोघांना बसता येईल, असे विसेक गाळे. एरवी, स्मशान शांतता असणाऱ्या या दुकानात कॉलेज सुटले की जणू किलबिलाट सुरू होते. नेमके या कॅफेंमध्ये दडलंय काय? असा प्रश्न सर्रास सगळ्यांनाच पडतो. पण, त्याकडे लक्ष देतंय कोण? या कॅफेंमध्ये काय दडलंय, याचा खुलासा शुक्रवारी झाला. शहरात तीन-चार अशी चहाची […]
समांतर क्रांती वृत्त नंदगड: फ्रान्समध्ये होत असलेल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमुळे विशेष चर्चेत असलेल्या बॅस्टिल परेडमध्ये नंदगड येथील २१ वर्षीय तरूणाने सहभाग घेतला आहे. रचेत शिवानंद तुरमुरी असे त्याचे नाव असून तो नेव्हीमध्ये कम्यूनिकेशन अधिकारी पदावर कार्यरत आहे. फ्रान्सच्या दौऱ्यातील त्याच्या सहभागाबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे. बॅस्टिल डे परेडला फ्रांन्समध्ये राष्ट्रीय दिवस म्हणून […]
समांतर क्रांती विशेष आज शुक्रवारी (१४ जुलै) हा दिवस देशाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. भारताकडून चांद्रयान- ३ दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथून चंद्राच्या दिशेने झेपावेल. हा खरंच देशवासीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. तसाच तो खानापूर तालुकाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाराही आहे. कारण, या चांद्रयानाच्या यशस्वी उड्डाणासाठी तालुक्यातील अनगडी येथील प्रकाश पेडणेकर या युवा वैज्ञानिकाचा […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर: बेरोजगारी वाढली आहे, ही ओरड नेहमीचीच झाली आहे, पण तरूणांनी आता सरकारी नोकरीच्या मागे न लागता, स्वत:चा व्यवसाय थाटावा आणि त्यातून समाजसेवा करण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन पत्रकार वासूदेव चौगुले यांनी केले. सावरगाळी येथील उदय नारायण कापोलकर यांच्या कापोलकर ट्रेडर्स या दुकानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि […]
समांतर क्रांती न्यूज लोककलावंत अभिजीत कालेकर यांना नाशिक येथील तेजस फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले. छ. संभाजीनगर ( औरंगाबाद) येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. मराठी लोक संस्कृतीची जोपासना, त्यासाठीचं कार्य आणि कला- सांस्कृतीक कार्याची दखल घेवून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. या प्रसंगी […]
चेतन लक्केबैलकर शाळेत वर्गातील फळ्याच्या अगदी मधोमध लिहिलेला ‘मिठाशिवाय चव नाही, आईशिवाय माया नाही.’ हा सुविचार आणि सांबर-डाळ आळणी किंवा खारट झाल्यास येणारा संबंध वगळता मिठाशी अस्मादिकांस कांही देणं-घेणं नाही. हिंदी सिनेमातल्या ‘नमकहराम, मै तुझे जिंदा नही छोडुंगा’चा डॉयलॉग सोडला तर दररोजच्या उदरभरणात मिठाला अणण्यसाधारण महत्व असुनही त्याच्याशी उपरोक्त नोंद केल्याप्रमाणे क्वचीतच आम्ही मिठास जागतो.(अर्थातच! […]
जय महाराष्ट्र! बोला की, काय चाललंय? हा संवाद कोल्हापूर, मुंबई किंवा पुण्यातला नाही. सीमाभागातील तरूणसुध्दा संभाषणाची सुरूवात ‘जय महाराष्ट्र’ने करतात. मराठी आपली मायबोली आहे, तीच्यासाठी गेल्या ६६ वर्षांपासून आपले बापजादे खपत आले आहेत,याची जाणिव उशिरा का होईना सीमाभागातील तरूणांना होत आहे. इतकंच काय एरव्ही हॉटेलमध्ये चहाचे घोट रिचवितांना टवाळकी करणारे तरूणही सीमाप्रश्नावर भरभरून बोलतांना दिसताहेत. […]