खानापूर: यडोगा रोडवरील रमेश पाटील यांच्या घरातील चोरीची घटना ताजी असतांना पुन्हा चापगावात चोरीचा प्रयत्न उघडकीस आला आहे. प्राथमिक मराठी शाळेमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न काल रविवारी सुट्टीच्या दिवशी अज्ञात समाजकंटकाने केला. तिजोरी पाडून समोरील काच फोडून पुस्तके अस्ताव्यस्त टाकून देण्यात आल्याचा प्रकार आज सोमवारी शाळा सुरू झाल्यानंतर उघडकीस आला. शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष मष्णू चोपडे यांनी पाहणी करून ग्राम पंचायत विकास अधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे.शाळेत झालेल्या या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत असून संबंधीतावर कारवाईची मागणी होत आहे.
खानापूर म.ए.समिती अध्यक्षपदी पुन्हा गोपाळ देसाईच
खानापूर म.ए.समिती अध्यक्षपदी पुन्हा गोपाळ देसाईचखानापूर: येथील समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी पुन्हा गोपाळ देसाई, कार्याध्यक्षपदी मुरलीधर पाटील, निरंजन देसाई, सरचटनिस आबासाहेब दळवी, सहचिटनिस रणजित पाटील, खजिनदार संजीव पाटील, उपखजिनदार पांडुरंग सावंत तर उपाध्यक्ष म्हणून जयराम देसाई, कृष्णा कुंभार, मारुती गुरव, रमेश धबाले आणि कृष्णा मंनोळकर यांची निवड करण्यात आल्याचे माजी […]