समांतर क्रांती वृत्त
चापगाव: येथील ग्राम पंचायतीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत ५ विरुध्द ४ असे मतदान झाल्याने अध्यक्षपदाच्या निवडीत गंगव्वा सिध्दप्पा कुरबर (वड्डेबैल) यांनी नजिर सनदी यांचा तर उपाध्यक्षपदाच्या निवडीत मालूबाई अशोक पाटील यांनी लक्ष्मी हणमंत मादार यांचा पराभव केला. पशू वैद्याधिकारी डॉ. उमेश होसूर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. ग्रा.पं.सदस्य नागराज यळ्ळूकर, सूर्याजी पाटील, देमव्वा मादार, माजी अध्यक्षा स्नेहल पाटील, माजी उपाध्यक्ष मारूती चोपडे आणि समिती नेते रमेश धबाले यांच्यासह पंचायत अखत्यारीतील नेत्यांनी विशेष प्रयत्न केले. निवडीनंतर विकास अधिकारी आरती अंगडी यांनी उभयत्यांचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले. नुत अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या समर्थकांनी यावेळी जल्लोष साजरा केला. पंचायतीवर म.ए.समितीचे वर्चस्व प्रस्तापित झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
‘सरपंच’पदी कुणाची लागली वर्णी?
समांतर क्रांती वृत्त खानापूर: तालुक्यातील कांही ग्राम पंचायतींची निवडणूक आज पार पडली. यामध्ये आरक्षणामुळे कांही निवडी अविरोध झाल्या तर कांही ठिकाणी चुरशीची लढत पहावयास मिळाली. जांबोटी ग्रा. पं.च्या उपाध्यक्षपद निवडीत धक्कादायक निकाल लागला. वडगावचे सुनिल शंकर देसाई यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी अनपेक्षीत साथ देत सर्वानाच धक्का दिला. चापगाव ग्रा.पं.ची निवडणूक अटीतटीची झाली. यात म.ए.समितीला निर्विवाद वर्चस्व […]