चर्चा वरवरच्या / सदा टीकेकर
भाजप हा केवळ भटा-बामणांचा पक्ष असल्याचे कारवार लोकसभा मतदार संघातील एका महिलेने गाण्यातून मत व्यक्त केले आहे. भाजपचे विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांच्या प्रचारासाठी बनविण्यात आलेल्या या गाण्यात त्या महिलेने ब्राम्हणांनी एकत्र येऊन ब्राह्मण असणाऱ्या कागेरींना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. हे गाणे समाज माध्यमात व्हायरल केले जात आहे.
प्रत्यक्षात संपूर्ण देशात केवळ तीन टक्के असलेले ब्राम्हण कितीही एकवटले तरी भाजपचा खासदारच काय ग्राम पंचायतीचा सदस्यदेखील निवडून आणू शकत नाहीत, ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. असे असतांनाही संपूर्ण बहुजन समाजाला नावे ठेवत अशी ‘बत्तमिजी’ केवळ हेच लोक करू शकतात, जे कधीच हिंदूंच्या ‘कॅटॅगिरी’त स्वत:चा समावेश करीत नाहीत.
अलिकडेच पुण्यातदेखील असा अकलेचे तारे तोडण्याचा भयंकर प्रकार घडला होता. ब्राम्हणांनी केवळ भाजपलाच मतदान करावे, असे आवाहन तथील ब्राम्हणांनी एका पत्रकाद्वारे केले होते. असा प्रकार जर इतर जाती-धर्मांच्या व्यक्ती-संघटनेकडून झाला असता तर याच लोकांनी थयथयाट केला असता. त्यांचीही कांही चूक नाहीच म्हणा! कारण इतर धर्मीय आणि विविध जातीपंथीय लाचार बनले आहेत.
एकीकडे हिंदू खतरेमे है म्हणायचे आणि दुसरीकडे स्वत:च्या संरक्षणाची बेजमी करायची ही दृष्टप्रवृत्ती ज्यांनी जोपासली आहे, ते अशा प्रकारचा हडेलहप्पीपणा करीत असतात. पण, त्याचे परिणाम समाजवादी लोकांनाही भोगावे लागतातच. देशात विकास झाल्याचे खोटे ढोल पिटले जात असतांना इलेक्टोरल बॅांड सारखा न भूतो न भविष्यती असा गैरव्यवहार का झाला आणि कोणी केला याचे उत्तरदेखील अशा या अपप्रचारातून मिळते. जे खतरे मे आहेत, ते हेच लोक आहेत, ज्यांना ‘झोला उठाके भागणे की चिंता’ आहे. त्याशिवाय अनेक समाजवादी ब्राम्हणांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना भाजप-संघ परिवाराला अशा प्रकारे जातीयवादी प्रचार करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
ब्राम्हण समाजाकडून जाणीवपूर्वक असा जातीयवादी प्रचार केला जात असतांना बहुजन समाजातील मराठा आणि इतर सर्व मागासवर्गीय जनता अशा प्रकारे का एकत्र येऊन भाजपला ‘जात’ दाखवून देत नाही. मराठ्यांचा वारंवार अपमान होत आहे. मागासवर्गीय समाजाच्या मतांना भाजपाकडून सतत गृहीत धरलं जात आहे. मराठ्यांचे वर्चस्व असणाऱ्या कारवार लोकसभा मतदार संघात तरी मराठ्यांनी आणि इतर सर्व मागासवर्गीयांनी एकत्र येऊन हा जातीयवादी पेशवाई अहंकार झोडपायला हवाच.
पर्वरीत उद्या मराठी राजभाषा संमेलनाचे आयोजन
पणजी: मराठी असे आमुची मायबोली व गोमंतक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या शनिवारी २७ एप्रिल २०२४ रोजी आझाद भवन पर्वरी येथील सभागृहात मराठी राजभाषा संमेलन होत आहे. महाकवी सुधाकर गायधनी हे संमेलनांचे उद्घाटक तर दिग्गज ज्येष्ठ साहित्यिक. गो. रा. ढवळीकर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. प्रकाश भगत हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष, पूर्णिमा देसाई या […]