- निवडणूक म्हटलं, की अफवा आणि चर्चांना उधाण येते. उमेदवार एकमेकांवर धुळफेक करतात. आश्वासनांच्या खैराती करतात. कार्यकर्ते आपापल्या नेत्यांची भलावण करीत एकमेकांवर तुटून पडतात. सगळीकडे संशयकल्लोळ माजलेला असतो. पण, म्हणतात ना. आग लागल्याशिवाय धूर निघत नाही.
आता हेच पहा ना, सर्वच उमेदवारांना त्यांच्या पक्षाने उमेदवारी घोषीत करून आठवडा लोटला तरी उमेदवारी मिळविण्यासाठी केलेल्या करामतींच्या चर्चेची धूळ अद्यापही बसलेली नाही. खानापुरातील एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी तब्बल १२ कोटी मोजल्याची चर्चा आहे. हल्ली उमेदवारी मिळविणे ही तारेवरची कसरत झाली आहेच म्हणा! पण, म्हणून पक्षनेत्यांना तब्बल १२ कोटी चारल्याची ही चर्चा मतदारांच्याच नव्हे तर त्यांच्या स्वपक्षीयांच्या भुवया उंचावणारी ठरली. आधीच नाराज स्वपक्षीयांनी मग या १२ च्या (कोटीच्या) उमेदवाराला ‘सोलायचेच’ असे ठरविले. कांहीनी सुरूवातीला बंडाचा आव आणला. कांहीनी आम्ही पक्ष सांगेल तो आदेश पाळू असे सांगत नाराजीचा सूर आळवला.
हेही वाचा..
झालं.. उमेदवाराला शेवटी समजलं, आता अजून कांही कोटी असेच उधळावे लागणार! त्यांनी सगळ्यांचे हात ओले आणि खिसे गरम केले. दुसऱ्याच दिवसापासून ‘तो’ उमेदवारचा ‘आमचा’ उमेदवार झाला. प्रचार आता रंगात आला आहे. पुन्हा नवी चर्चा सुरू झाली आहे. ‘‘अरे, त्याच्याकडचे पैशे संपलेत. एक रुपया काढत नाहीय. मतदानापर्यंत हा कांही टिकणार नाही.’’ स्वकीयांनीच ही चर्चा चघळायला सुरूवात केल्याने मतदारांसमोरही कोटींचा दुसरा उमेदवार शोधण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. उमेदवारही काही करू शकत नाही, कारण त्यांनीच स्वत: ही कोटींची भानगड सुरू केली. आपण कांहीही विकत घेऊ शकतो, हा अहंगंड त्यांच्या आता चांगलाच अंगलट येत असून प्रत्येक मत विकत घ्यायची वेळ त्यांच्यावर आली आहे.
पक्षनिष्ठा वगैरे झूठ साला.. एका हाताने द्या, दुसऱ्या हाताने घ्या, हेच आता निवडणुकीचे समिकरण झाले आहे. नेते भ्रष्टाचार करतात, चिरमुऱ्यासारखे पैसे उधळतात. पक्ष आणि नेते विकले जात असतील तर कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी का म्हणून मागे राहावे. एक काळ होता, पक्ष त्यांच्या उमेदवाराला निवडणूक निधी द्यायचा. आता पक्षांनाच इच्छूकांनी फंड द्यावा लागतो. तो नक्की कुणापर्यंत पोहचतो माहीत नाही. पण, ना खाऊंगा, ना खाणे दुंगा ही केवळ आरोळीच ठरली आहे.
असो. आता पुन्हा एक चर्चा सुरू झालीय, १२ कोटी उमेदवारी मिळविण्यासाठी दिले. निवडणुकीसाठी विसेक कोटी तरी खर्च होणार. हा एवढा पैसा यांच्याकडे आला तरी कुठून?
चर्चा तर होणारच ना भाऊ! होऊ दे खर्च…
मराठी माणसाला जगविण्यासाठी समितीला मत द्या
आमदार निलेश लंके यांचे आवाहन; गर्लगुंजीत मुरलीधर पाटील यांना प्रतिसाद सोमवारी (ता.०१) गर्लगुंजी येथे मुरलीधर पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. सभेला मराठी भाषिकांनी तोबा गर्दी केली होती. त्यांच्या प्रचाराच्या धडाक्याने विरोधकांनाही धडकी भरली आहे. गेल्या ६६ वर्षांपासून मराठी भाषिक सीमाभागात कितपत पडला आहे. कर्नाटक सरकार मराठी माणसांवर अनन्वित अत्याचार करीत […]