खानापूर तालुक़ा ब्लॉक अध्यक्ष अॅड ईश्वर घाडी व माजी झेडपी पांडुरंग देसाई यांनी अस्वल हल्ल्यात जखमी झालेल्या विलास चिखलकर यांच्या कुटुंबियांची केएलई हॉस्पीटल बेळगाव येथे जाऊन भेट घेतली.
कालच माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी एसीएफ खानापूर यांचेशी संपर्क करून ताबडतोब सरकारी मदत करण्यासंदर्भात सांगितले आहे. कालच चिखलकर यांच्या मुलाकडून आम्ही कागदपत्रे घेऊन एसीएफ खानापूर यांचेकडे दिली असून एसीएफ खानापूर यांनी काल सकाळीच मदती संदर्भात ऑनलाईन अर्ज सरकारकडे केला असल्याचे सांगितले…
आज ताईंच्या सुचनेवरून ब्लॉक कॉंग्रस अध्यक्ष ॲड घाडी साहेब केएलई मधे जाऊन पेशंट व मुलाला भेटून आले. यावेळी माजी झेडपी पांडुरंग देसाई सुद्धा उपस्थित होते. पेशंट ला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यास खानापूर कॉंग्रेस व डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर ह्या प्रयत्नशील आहेत.
राशन घोटाळा उघड करणार
खानापूर तालुक्यातील राशन घोटाळा लवकरच काही तासांत उघड करणार : सुर्यकांत कुलकर्णी ( पंचहमी योजना अध्यक्ष ) यांनी असा इशारा दिला आहे. गोर गरीब जनतेचा तांदूळ कोण गायब करतयं ? कसा गायबं करतात ? कोण कोण सामील आहे ?सगळ्या भानगडी बाहेर काढणार, असे ते म्हणाले. गेले अनेक वर्ष दरमहा लाखो रुपयांचा राशन मधे भ्रष्टाचार चालू […]