
खानापूर: आम्ही जे केलं, तेच तुम्हीही करा, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकात ‘ऑपरेशन लोटस’चे आवाहन भाजपला केले. उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे- कागेरी यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. खानापुरातील मलप्रभा मैदानावर झालेल्या या सभेला ते तब्बल चार तास उशिरा पोहचले. त्यातही रटाळ भाषणामुळे उपस्थित कंटाळले होते.
देशात पुन्हा मोदींचे सरकार आले पाहिजे. तेच देशाचा उध्दार करू शकतात. विरोधकांकडे अजेंडाच नाही. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे. मोदींना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी हेगडे-कागेरी यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. मी निधड्या छातीचा शिवसैनिक असून विचार न पटल्याने आम्ही भाजपशी संधान साधले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पाचजणांना अटक करण्याचा कट रचण्यात आला होता. त्याला माझा विरोध होता. काँग्रेसशी युती केल्यामुळेच आम्ही बाळासाहेबांचे विचार जीवंत ठेवण्यासाठी भाजपचा हात धरल्याचे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीनंतर तुम्ही कर्नाटकात तेच करा. आमचा पॅटर्न वापरा, आम्ही कधीही मदत करायला तयार आहोत, असे सांगताना कर्नाटकातदेखील ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चेला हूल दिली. यावेळी उपस्थित भाजप नेत्यांनी त्यांना प्रतिसाद दिला. सभेला माजी केंद्रीय मंत्री प्रमोद मध्वराज, आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार महांतेश कवठगीमठ, संजय पाटील, तालुकाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा कार्यकारिणी सचीव धनश्री सरदेसाई-जांबोटीकर, प्रमोद कोचेरी, जोतिबा रेमाणी, आनंद अस्नोटीकर आदी उपस्थित होते.
माझी ३६ देशात ओळख
आम्ही जो पॅटर्न राबविला त्यामुळे माझी जगातल्या ३६ देशात ओळख निर्माण झाली आहे, असे ना. शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी त्यांच्या भाषणात केवळ एकदाच उमेदवारांचा उल्लेख केला. त्याशिवाय त्यांनी महाराष्ट्राचा उल्लेखदेखील टाळला. अर्धा तासांच्या भाषणात त्यांनी सुमारे १०७ वेळा ‘मोदी नामा’चा जप केला. 2014 नंतर देशात एकही अतिरेकी हल्ला झाला नसल्याचा जावाईशोध त्यांनी लावला.
‘भाजप-निजद’ने उज्वल्ला योजनेच्या बदल्यात ‘प्रज्वल’ योजना लाँच केली
डॉ. अंजली निंबाळकर यांचा आरोप; कारवार तालुक्यात प्रचार सभा कारवार: उज्वला योजना पूर्णपणे फोल ठरल्यामुळे भाजप-निजदने आता प्रज्वल योजना लाँच केली आहे. महिलांवरील अत्याचारात कोण आघाडीवर आहे, हेच यातून दिसून येते. भाजपच्या नेत्यांना खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या गुन्हेगारी वृत्तीची पूर्णत: माहिती असूनही खुद्द पंतप्रधान त्यांचा प्रचार करतात, यावरून भाजपची नीतीमत्ता किती घसरली आहे, हे संपूर्ण […]