समांतर क्रांती वृत्त
खानापूर: भाजपचा हिंदुत्ववादी कार्यकर्ता पंडित ओगले याच्याविरुद्ध खानापूर पोलिसात तक्रार नोंद झाली आहे. नगर पंचायतीचे मुख्याधिकारी राजू वठारी यांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार केल्याने ओगले आणि त्याचे समर्थक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून नगर पंचायतीचे स्वच्छता कर्मचारी वेतनासाठी आंदोलन करीत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या भाजप नेत्यांनी मुख्याधिकाऱ्यांना अर्वाच्य शब्द वापरले, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनीही हस्तक्षेप करीत श्री. वाठार यांच्या बदलीची शिफारस केली आहे. याच वेळी ओगले याने त्यांना अर्वाच्य शब्दात जातीवाचक शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, वठारी हे कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याची तक्रार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. त्याची परिणीती आंदोलनात झाली आहे. वठारी यांनी मात्र काही जण त्यांच्याकडे हप्ते मागत होते त्याला विरोध केल्याने हा सगळा प्रकार सुरू झाला असल्याचे म्हटले आहे. यात आता ओगले याच्यावर त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसात धाव घेतल्याने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. ओगले यांनी या आरोपांचे खंडन केले आहे.
गोवा मॅरेथॉनमध्ये कल्लाप्पा तिरवीरना सुवर्ण पदक
खानापूर: करसवाडा- म्हापसा गोवा येथे नुकताच झालेल्या मरेथॉनमध्ये ३ किलोमीटर खुला गटातून ५० वर्षावरील गटामध्ये तोपिनकट्टी गावचे सुपुत्र श्री कल्लाप्पा मल्लाप्पा तिरवीर यांनी सुवर्णपदक मिळविलेश्री तिरवीर हे व्यवसाय निमित्त कोल्हापूर येथे स्थायिक आहेत. कोल्हापूर या ठिकाणी सतत प्रयत्न करून ज्योती क्लब बेळगाव यांच्या सानिध्यात गर्लगुंजी गावचे क्लबचे संस्थापक वरिष्ठ कोच एल जी कोलेकर व एल […]