समांतर क्रांती वृत्त
खानापूर: महामार्ग आणि टोल प्लाझासाठी करण्यात आलेल्या भूसंपादनाच्या प्रकरणाचा तातडीने निकाल लावू असे अश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी येथील बैठकीत दिले. पण, टोल वसुलीला विरोध करू नका असे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे आज सोमवारपासून गणेबैल टोल नाक्यावर टोलवसुलीला सुरूवात करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी रविवारी तातडीने शेतकऱ्यांची आणि स्थानिक नेत्यांची बैठक येथील विश्रामगृहात घेतली. यावेळी बैठकीला आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुकाध्यक्ष संजय कुबल, महामार्ग प्रकल्प संचालक भुवनेश, प्राताधिकारी बलराम चव्हाण उपस्थित होते.
३२ एकर अतिरिक्त जमीन संपादीत करण्यात आली आहे. त्यात २२ गावांचा समावेश असून या जमीनींचा सर्व्हे करून आठ दिवसात सर्व प्रकरणे निकाली काढू, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले. यावेळी शेतकरी कल्लाप्पा घाडी यांनी संपादीत जमिनीला एन.ए.प्रमाणे भरपाई द्यावी, तसेच सेवा रस्त्यांचे काम पूर्ण करून शेतकरी व वाहन चालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. यावेळी ॲड. चेतन मनेरीकर, शेतकरी नेते प्रकाश नाईक, आबासाहेब दळवी, जोतिबा रेमाणी यांनीही त्यांची मते मांडली.
आज मिळणार पास..
टोल नाक्यासाठी जमीन गमावलेल्यांच्या वारसांना टोल नाक्यावरील कामावर संधी दिली जाणार आहे. तसेच आज सोमवारपासून स्थानिक वाहनधारकांना मासिक पासचे वितरण केले जाणार आहे. त्यासाठी वाहन परवाना आणि आधार कार्डची आवश्यकता आहे. टोल नाक्यावरील कार्यालयात ही नोंदणी केली जाणार असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
अहो आश्चर्यच! चक्क रस्त्यावर राबविली ‘तलाव योजना’
समांतर क्रांती वृत्त खानापूर: तालुक्यातील चांगला रस्ता दाखवा बक्षिस मिळवा, अशी योजना तालुक्यातील लोकप्रतिनिधींसाठी आयोजित करण्याची गरज आहे. त्यासाठी विजेत्यांना हमखास ‘गावरान’ पारितोषिके देण्याची योजना प्रत्येक गावातून व्हायला हवी. असे प्रवाशांना वाटू लागले आहे. कारण, तालुक्यातील एकही रस्ता आजघडीला खड्ड्याविना नाही. बैलूरच्या रस्त्याची आवस्था तर शासनाने रस्त्यावरच तलाव योजना राबविली आहे की काय? असा प्रश्न […]