समांतर क्रांती / बंगळूर
महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर अश्लिल टिप्पणी केल्याप्रकरणी आज शुक्रवारी (ता.२०) लोप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने विधान परिषद सदस्य सी.टी.रवी यांना सशर्त जामीन मंजूर केला. त्यांच्या सुटकेचा अंतरिम आदेश न्यायालयाने बजावला.
सकाळी आमदार सी.टी.रवी यांना येथील जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सदर दावा लोकप्रतिनिधींच्या सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला. दरम्यान, त्यांना पोलिस बंगळूरला घेऊन जात असतांनाच त्यांना लोकप्रतिनिधींच्या विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर करीत दिलासा दिला. तपासात सहकार्य करण्याची सूचना न्यायालयाने त्यांना केली आहे.
दरम्यान, आमदार रवी यांच्या अटकेविरोधात भाजपच्यावतीने बेळगावात आंदोलन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष वाय.बी.विजयेंद्र आणि विरोधी पक्षनेते आर.अशोक यांच्या नेतृत्वाखाली भाजपने काँग्रेसविरोधात जोरदार निदर्शने केली.
काँग्रेसच्या शतकपूर्ती अधिवेशनला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार
समांतर क्रांती / खानापूर बेळगाव येथे काँग्रेस अधिवेशनाच्या शतकपूर्ती निमित्त २६ आणि २७ डिसेंबर रोजी आयोजीत कार्यक्रमाला खानापूर तालुक्यातून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचा निर्धार तालुका काँग्रेसच्यावतीने जाहीर करण्यात आला. आज येथील शिवस्मारकात झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूरचे प्रभारी व काँग्रेस नेते पारिश जैन होते. प्रारंभी उपस्थित यांचे स्वागत खानापूर ब्लॉक […]