
समांतर क्रांती / स्पेशल रिपोर्ट
तालुक्यातील राजकारणाने सध्या गय खाल्ली आहे. एकीकडडे तालुक्यातील सत्ताधारी भाजपाकडे कांहीच कार्यक्रम नाही; शिवाय सर्वसामान्यांच्या समस्यांशी त्यांना कांही देणे-घेणे राहिले नाही. त्याउलट काँग्रेसने मात्र भलतेच जोमात असल्याची प्रचिती गेल्या कांही महिन्यांपासून तालुकावासीयांना येत आहे. भाजपचे आमदार विठ्ठल हलगेकर आणि त्यांच्या पक्षांच्या अपयशाचा आलेख दिवसेदिवस चढत चालला असतांना काँग्रेसींचा उत्साह मात्र तालुकावासीयांत वाहवा मिळवून जात आहे.
तालुक्यातील प्रशासकीय कार्यालयात माजलेल्या बजबजपुरीविरोधात काँग्रेसने जणू विडाच उचलला आहे. तालुका पंचायतीच्या कार्यनिर्वाहक अधिकाऱ्याच्या निलंबनापासून सुरू झालेला सिलसिला अखंड ठेवण्यात काँग्रेसच्या नेत्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांना ठोकलेली मांड अद्याप सुरू असून आजवर पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक, तहशिलदार नायक, अडीएलआर आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांची तालुक्यातून गच्छंती करण्यात त्यांनी कोणतीच कसूर सोडली नाही. कांही प्रमाणात सर्वसामान्यांना यामुळे दिलासा मिळाला असल्याने काँग्रेसबद्दल जनमत तयार होत आहे.
आता तर शासकीय इस्पितळातील (एमसीएच हॉस्पीटल) भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी आवाज उठवित वैद्याधिकारी आणि तालुका वैद्याधिकाऱ्यांना निर्वाणीचा ईशारा दिला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे अध्यक्ष ॲड ईश्वर घाडी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तालुक्यातील समस्यांबाबत घेतलेली भूमिका विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. नुकताच प्रतिमहिना १५ किलो तेशनवरील तांदूळ न दिल्यास कारवाई करू असा इशारा देत पंचहमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी तालुक्यातील जनतेला दिलासा दिला आहे. एवढंच नाही तर प्रत्येक नागरीकांच्या समस्या स्वतंत्र्यपणे सोडविणाऱ्यांवर काँग्रेसजणांनी भर दिला आहे.

एकंदर काँग्रेसच्या तुलनेत भापकडे कोणतेच कार्यक्रम नाहीत. त्यातही पक्षाध्यक्षपद पूर्वभाकडे गेल्यानंतर मराठी भाषिकांनी पक्षकार्याकडे दुर्लक्षच केले आहे. पूर्व भागात माजी आमदार अरविंद पाटलांना शह देण्याच्या नादात आमदारांनी मराठी भाषिकांतील आपली प्रतिमा खजील केल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरात आमदार सी.टी.रवि यांचा ‘आनंदसोहळा’ वगळता भाजपने कोणताच लोकोपयोगी कार्यक्रम हाती घेतलेला नाही. परिणामी, भाजपचा तालुक्यातील करिश्मा उतरत असल्याचे चित्र नेत्यांना हादरा देणारेच नाही तर कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या वाटेवर नेऊन ठेवणारे आहे.
आमदार हलगेकर यांनी केवळ क्रिकेट आणि जात्रा-यात्रांवर भर देत सर्वसामान्यांच्या समस्यांना जणू तिलांजली दिली आह. त्याचा परिणाम, त्यांच्या कथीत लोकप्रियतेवर होत आहे. विशेष म्हणजे याचा फटका त्यांच्या कथीत ‘उत्तराधीकाऱ्यां’नाही बसत असून कोणत्याही कार्यक्रमांना हजेरी लावतांना त्यांना हजारदा विचार करावा लागत असल्याचे त्यांचेच ‘बगलबच्चे’ बोलू लागले आहेत.
एकूणच, तालुक्यातील राजकीय स्थिती काँग्रेस जोमात, भाजप जोमात अशी आहे. यावर काँग्रेसवासीयांच्या कानात वारे जाऊन त्यांची फटफजिती होणार की, भाजपच्या ऱ्हासाची ही नांदी ठरणार हे येणारा काळच ठरवणार आहे.

‘भीमगड’चं जंगल माणसांना खाऊ लागलंय?
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर कोकणाची सोनेरी किनार लाभलेला खानापूर तालुक्याचा पश्चिम घाट, त्यातच सह्याद्रीच्या कुशीत वसलेली खुराड्यासारखी गावं.. शिव छत्रपती आणि छत्रपती संभूराजेंच्या पदस्पर्शाने पावन झालेला ‘भीमगड’ आणि या किल्ल्याचा परिसर आज चर्चेत आहे. शापीत बनत चालेललं हे जंगल ‘माणसांनाच खायला उठलंय की काय?’ दोन दिवसांपूर्वी गवाळीच्या तरूणाने नेरसेजवळ जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. […]