डॉ. निंबळकरांचा विजय निश्चित; कागेरींची प्रचारात पिछेहाट कायम
कारवार: मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला तसा, प्रचाराचा वारू उधळला आहे. भाजपकडे विकासाचा मुद्दा नाही, त्या तुलनेत पाच गॅरंटी राबवून काँगेसने मतदार संघाची मशागत केली आहे. परिणामी, डॉ. अंजली निंबाळकर यांचा कारवार (उत्तर कन्नड) मतदार संघातील विजय निश्चित मानला जात आहे. कागेरी यांच्यावरील आरोपांचे अंडन करण्यात आलेले अपयश आणि विकास कामातील हलगर्जीपणा यामुळे भाजपचेच कार्यकर्ते काँग्रेसला मतदान करा, असे अवाहन करीत असल्याने हेगडे- कागेरी यांची बोबडी वळली आहे.
उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघातील आठपैकी पाच मतदार संघात काँग्रेसचा प्रभाव आहे. कित्तूरमध्ये बाबासाहेब पाटील यांनी एकही मत भाजपला जाऊ देणार नाही, असा निर्धार करून प्रचाराची मोट बांधली आहे. हल्याळमधून माजी मंत्री आर.व्ही.देशपांडे यांना जिव्हारी लागलेला प्रशांत देशपांडे यांच्या पराभवाचे उट्टे काढायचे आहेत. कारवारमधून सतिश सैल यांनी जी मोर्चेबांधणी केली आहे, त्याला राष्ट्रीय पातळीवरही तोड नाही. त्यांनी कारवारमधील एकही मत हलणार नाही याचे नियोजन केले आहे.
भटकळमधून जिल्हा पालक मंत्री मंकाळू वैध यांच्या नेतठत्वाखाली संपूर्ण मतदार संघातील मतदान डॉ. अंजली निंबाळकर यांनाच होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. शिरसी या स्वत:च्या मतदार संघातून जेवढा विरोध विश्वेश्वर हेगडे कागेरींना आहे, त्याहून अधिक कोणत्याच विधानसभा मतदार संघातून नाही. शिरसीतून त्यांना एकही मत मिळू नये, यासाठी खासदार अनंतकुमार हेगडे यांनी दंड थोपटले आहेत. ते त्याांचे पांपारिक विरोधक असल्याचा हा परिणाम आहे. तरीच ते प्रचारासाठी घराबाहेर पडले नाहीत.
यल्लापूरमधून ज्यावेळी आमदार शिवराम हेब्बार यांचे चिरंजीव विवेक हेब्बार यांनी डॉ. अंजली निंबाळकर यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हाच डॉ. निंबाळकर यांना हेब्बार कुटुंबीय आणि यल्लापूरच्या मतदारांचा एकमुखी पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले होते. परिणामस्वरूप मतदानादिवशी मतयंत्रात यल्लापूरमधून काय उघड होईल, हे आतापासूनच जनतेच्या नजरेसमोर आहे.
खानापूरमधून अपप्रचार आणि खोकेबाजीच्या दमावर भाजप नेते टिप्पर उड्या मारत असले तरी निकाल काय असेल, हे माहिती असल्याने सर्सामान्य मतदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या पाठिशी आहे. भाजपचेच कार्यकर्ते कमळाऐवजी हातावर हात ठेवून असल्याने हेगडे- कागेरी यांचा पराभव निश्चित समजला जात आहे. आतापर्यंतच्या इतिहासात केवळ खानापूर- कित्तूर आणि हल्याळ मतदार संघातून आवश्यक मतदान झाले आहे. ते डॉ. निंबाळकरांना मिळणार असेल तर हेगडे-कागेरी यांच्या पराभवाची जाणीवपूर्वक बेजमी करण्यात आल्याचे दिसून येते.
हल्याळ तालुका अखत्यारीत मात्र डॉ. अंजली निंबाळकर यांना अजिबात मतदान होणार नाही, असा होरा असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा मोर्चा त्यादिशेने वळविला आहे. एकंदर, डॉ. निंबाळकर यांना ही लढत सोपी नसली तरी अवघडही नाही. कारण, त्यांच्या पक्षाचा आठपैकी पाच विधानसभा मतदार संघावर प्रभाव आहेच, शिवाय यल्लापूर या मतदार संघावरही त्यांचा वैयक्तीक प्रभाव असल्याने मराठी विरोधी विश्वेश्वर हेगडे यांना धूळ चारण्यास काँग्रेसी नेते- कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.
अनंतकुमार हेगडे पंतप्रधानांना ‘हात’ देणार?
निवडणूक प्रक्रियेला सुरूवात झाल्यापासून खासदार हेगडे हे बंद दाराआडून राजकारणाचे पत्ते पिसत आहेत. शिरसीतून त्यांना भाजपला एकही मत मिळवून द्यायचे नाही. कारण, माजी मंत्री विश्वेश्वर हेगडे – कागेरी हे त्यांचे पारंपारिक राजकीय शत्रू आहेत. त्यातच अनंतकुमार यांची प्रतिमा मलिन करण्यात कागेरींनी महत्वाची भूमीका बजावली असल्याचा आळ आहे. त्यामुळे २८ रोजी हेगडेंच्या घरासमोरील मैदानात होणाऱ्या पंतप्रताधान […]