
खानापूर : खानापूर तालुका काँग्रेसतर्फे उद्या मंगळवारी (ता. 11) सकाळी 11 वाजता नूतन युवक काँग्रेस अध्यक्षांचा सत्कार समारंभ येथील शिवस्मारकात आयोजित करण्यात आला आहे. या सत्कार समारंभाला अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव आणि माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर या उपस्थित राहणार आहेत. सदर कार्यक्रमाला तालुक्यातील काँग्रेस नेते, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी व शहर ब्लॉकचे अध्यक्ष महांतेश राऊत यांनी केले आहे.

तहसिलदार प्रकाश गाकवाड निलंबीत
समांतर क्रांती / खानापूर सुमारे ४ कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी खानापूरचे तहसिलदार प्रकाश श्रीधर गायकवाड यांना निलंबीत करण्यात आले आहे. ८ जानेवारी रोजी त्यांच्या राहत्या घरांसह सहा ठिकाणी लोकायुक्तांनी छापेमारी करून कागदपत्रे जप्त केली होती. प्रकाश गायकवाड यांनी त्यांच्या उप्तन्नापेक्षा अधिक मालमत्ता गैरमार्गाने कमावल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गायकवाड यांच्याबद्दल अनेक तक्रारी […]