
समांतर क्रांती / खानापूर
तालुक्यातील तोराळी येथील सीआरपीएफ कोब्रा कँपमधील कॉन्स्टेबल प्रदिपकुमार पांडे (वय ३६, रा. चंडीपूर-उत्तर प्रदेश) हे आज सोमवारी (ता.१३) सकाळी ६.३० वाजल्यापासून बेपत्ता आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते कोब्रा कँपमध्ये स्वयंपाकी म्हणून कार्यरत आहेत. आज सकाळी ते अधिकाऱ्यांची परवानगी न घेता, कुणालाही न सांगता ते कँपमधून निघून गेले असल्याची फिर्याद उपनिरीक्षक प्रदिपकुमार यांनी खानापूर पोलिसांत नोंदविली आहे. सदर इसम कुणाला आढल्यास खानापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

असा लढलो.. असा घडलो..
वर्गविग्रहाचे तत्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहचविणारा महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिध्दहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून ज्यांची प्रतिमा आहे, ते शाहीर अण्णाभाऊ अर्थात तुकाराम भाऊराव साठे यांच्या स्मृतीदिनी घेतलेली थोर विचारवंत, स्वातंत्र्य सैनिक, जेष्ठ कामगार नेते, गोवा मुक्ती आंदोलन आणि सीमालढ्याचे आग्रणी, साहित्यिक-पत्रकार कॉ. कृष्णा मेणसे (अप्पा) यांची ही साप्ताहिक समांतर क्रांतीत प्रसिध्द […]