खानापूर: येथील माजी उपनगराध्यक्षा आणि विद्यमान नगरसेविका लक्ष्मी अंकलगी यांच्या चिरंजीव श्रीधर बसवराज अंकलगी (वय ३३) याने पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करीत सरकारी कामात व्यत्यय आणल्याने त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी, शहराला लागून असलेल्या हलकर्णी फाट्यावरील एक हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ते बंद करण्याची सुचना पोलीस काँस्टेबल परशराम विठ्ठल चांभार (वय २७) यांनी केली. यावेळी हॉटेल बंद करणारा तू कोण असे विचारत श्रीधर याने त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरूवात केली. तसेच त्यांच्या कपड्यावरील बक्कल ओरबाडून काढले. त्यांना मारहाणही केली. याबद्दल त्यांनी खानापूर पोलिसात तक्रार दाखल केली होती.
श्रीधर अंकलगी याला पोलीसांनी अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर शहरात उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या हॉटेलवर कारवाई होणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
One thought on “खानापुरातील नगरसेविकेच्या चिरंजीवाला ‘जेल’ची हवा”