हैदराबाद: सध्या पुष्पा २ हा चित्रपट दररोज बॉक्स ऑफीसवर नवनवे विक्रमी नोंदवीत आहे. या चित्रपटाचा नायक पुष्पा अर्थात तेलगू सुपरस्टार अल्लुअर्जूनला दुपारी पोलीसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. #pushpa-2 #Court Custody to Allu Arjun
४ डिसेंबर रोजी पुष्पा २ या चित्रपटाचा प्रिमीयर शो संध्या थिअटरमध्ये होता. याची पूर्वकल्पना न देता अल्लुअर्जून थिअटरमध्ये गेला होता. तेव्हा त्याच्या चाहत्यांनी थिअटरबाहेर त्याला भेटण्यासाठी गर्दी केली. चेंगराचेंगरी झाल्याने एका ३९ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. #Court Custody to Allu Arjun
या घटनेनंतर अल्लुअर्जूनवर आरोप केले जात होते. पोलीसांनी याप्रकरणी अल्लू अर्जून, संध्या थिअटर आणि सुरक्षा पथकावर गुन्हा नोंदविला होता. अल्लू अर्जूनला शुक्रवारी (ता. १३) त्याच्या घरातून अटक केली. त्याला नामपल्ली न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, अल्लू अर्जूनने तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
- २५ लाखांच्या भरपाईची घोषणा
- अल्लू अर्जूनने चेंगराचेंगरीच्या घटनेत मयत झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांना २५ लाखांची भरपाई देण्याची तसेच जखमी मुलाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज शुक्रवारी (ता.१३) त्याला अटक करण्यात आली. पुष्पा २ चित्रपटाने सुमारे १५०० कोटींचा गल्ला जमवित अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.
माता न तू.. बाळाला सोडून आई पळाली
समांतर क्रांती / बेळगाव बिम्स रूग्णालयात नवजात बाळाला सोडून पळालेल्या महिलेविरोधात एपीएमसी पोलीसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेतील नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. बैलहोंगल शहरातील बाबीजान सद्दाम हुसेन सय्यद असे त्या महिलेचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बबीजानला ८ डिसेंबर रोजी BIMS मध्ये दाखल करण्यात आले आणि त्याच दिवशी तिने एका […]