समांतर क्रांती / खानापूर
शॉर्टर्कीमुळे ऊसाला आग लागलेल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे आदेश देऊनही दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने आज शुक्रवारी (ता.२०) हेस्कॉमला झटका दिला. अलिकडेच उद्घाटन झालेल्या हेस्कॉम कार्यालयातील तब्बल चार लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले असून हेस्कॉमवर नामुष्की ओढवली आहे.
चिक्कहट्टीहोळ्ळी येथील इरण्णा सन्नकी, बाबू पटगार, सिध्दाप्पा पुजारी आणि इराप्पा दास्तीकोप्प यांच्या ऊसाला शॉर्टसर्कीटमुळे आग लागली होती. यासंदर्भात न्यायालयात खटला सुरू होता. गतवर्षी या खटल्याचा निकाल लागून रु. चार लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने हेस्कॉमला बजावले होते. परंतु, हेस्कॉमने न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष चालविले होते.
सदर बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हेस्कॉमची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने बजावला. त्यानुसार न्यायालयाचे बिलीफ, फिर्यादींचे वकील आणि फिर्यादी शेतकरी यांच्या उपस्थितीत हेस्कॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयातील टेबबल, खूर्च्या, संगणक, प्रिंटरर्स आणि एक बोलेरो वाहन असे सुमारे चार लाख रुपयांचे साहित्य आज जप्त करण्यात आले.
हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांवर या कारवाईमुळे नामुष्की ओढवली आहे. न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधीतांवर कारवाई करण्यासाठी न्यायालयात दाद मागणार असल्याचे फिर्यादींच्या वकीलांनी स्पष्ट केले. जप्त केलेले साहित्य न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे हेस्कॉम कार्यालयातील कामकाजावर कारवाईचा परिणाम होणार आहे.
खानापुरात अमित शहांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा
समांतर क्रांती / खानापूर गृहमंत्री अमित शहा यांनी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले आहे. त्याच्या निषेधार्थ येथील डॉ. बाबासेब आंबेडकर उद्यान ते शिवस्मारक चौकापर्यत प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून अमित शहांचा निषेध नोंदविण्या आला. आज शुक्रवारी (ता.२०) खानापूर तालुक्यातील विविध दलित संघटनेच्यावतीने राजा श्री शिवछत्रपती चौकात रास्ता रोको व जोरदार निदर्शने करण्यात आली.तसेच […]