समांतर क्रांती / खानापूर
गोधोळी येथील ग्राम पंचायत सदस्याच्या भावाने घरात कुणीही नसतांना एका विवाहीतेचा विनयभंग केला. त्याबद्दल जाब विचारण्यासाठी गेलेल्या पिडीत महिलेच्या पतीला जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. नंदगड पोलिसात संशयीतावर विनयभंग आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याबद्दल सलमेश्वर कल्लाप्पा कदम याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, पिडीत महिला एकटीच घरी होती. संशयीत सलमेश्वर याने तिच्या घरात प्रवेश करून दरवाजा बंद केला. मी तुझ्यावर प्रेम करतो, तुसुध्दा माझ्यावर प्रेम कर असे म्हणत तिच्याशी अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. त्याने तिच्या अंगावरील कपडे फाडले. यावेळी ती ओरडत असतांना तिचे तोंड दाबले. तिने त्याच्या हाताचा चावा घेतल्याने त्याने पळ काढला.
पती घरी आल्यानंतर घडलेली घटना सांगितली. तिच्या पतीने संशयीत सलमेश्वर याला त्याच्या घरी जाऊन जाब विचारला असता, त्याला जातीवाचक शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याबद्दल पिडीत महिलेने नंदगड पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पिडीत दांपत्य मुळचे आलमेल विजयपूर येथील आहे. संशयीत सलमेश्वर कदम हा गोधोळी ग्राम पंचायत सदस्याचा भाऊ असल्याचे समजते. त्यामुळेच त्याची आरेरावी वाढली आहे.
नंदगड पोलिस स्थानकाच्या उपनिरीक्षक आर.एस.सपाटे यांनी गुन्हा नोंदवून तपास चालविला आहे. रात्री उशिरापर्यंत संशयीत फरारी होता. त्याचा शोध सुरू आहे.
खानापूर तालुक्यात कुठे आहे तहसिलदारांची शेतजमिन?
समांतर क्रांती / खानापूर तहसिलदार प्रकाश गायकवाड यांच्यावर लोकायुक्तांनी गुन्हा नोंदविल्यानंतर त्यांच्या घैरव्यवहाराच्या चित्तरकथा आता चवीने चघळल्या जात आहेत. ते जेथे जातील तेथे केवळ गैरमार्गाने मालमत्ता जमवीत होते, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे. खानापूर तालुक्यातील हब्बनहट्टीसह अनेक ठिकाणी त्यांनी शेतजमिन खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय त्यांनी बैलहोंगल, हल्याळ आणि निपाणीत शेतजमिनी खरेदी केल्या […]