समांतर क्रांती / खानापूर
तालुक्यातील देवलत्ती येथील तरूणाचे अपहरण करुन बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटनेतील भयानकता समोर आली आहे. जखमी महेश नारायण सिमनगौडर (वय ३५) याने दिलेल्या तक्रारीत, त्याचे गुप्तांग दाबून संशयीतांनी त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या घटनेतील संशयीत आरोपींना तात्काळ जेरबंद करण्यात यावी, अन्यथा देवलत्ती गावातील व्यवहार बंद ठेवून आंदोलन करू, अशी मागणी ग्रामस्थांनी दिली आहे.
महेश याने दिलेल्या रविवारी (ता.२९) तक्रारीत, कग्गनगी येथील संदीप आणि लक्केबैल येथील एकासह अन्य आठजणांनी त्याच्या शेतात जाऊन त्याला मारहाण करीत अर्वाच्य शिवीगाळ केली. त्यानंतर त्याला मारबडव करीत एका दुचाकीवरून बडस येथे नेले. तेथे त्याला लाठी-काठी आणि लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. लक्केबैल येथील त्या संशयीत आरोपीने तर त्याच्या गुप्तांग ओढून त्याच्या खूनाचा प्रयत्न केला. मारहाणीमुळे तो बेशुध्द झाल्याने संशयीतांनी त्याला तेथेच सोडून दिले, असे तक्रारी म्हटले आहे.
संशयीतांना महेश याचा खून करण्याच्या उद्देशानेच त्याचे अपहरण केल्याचे त्यांच्या वर्तणुकीवरून स्पष्ट होत असल्याने समबंधीतांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन प्रमुख संशयीत आरोपी हे एका संघटनेचे नेते म्हणून खानापूर शहरात मिरवत असतात. त्यांच्याबद्दल अनेक तक्रारी असल्या तरी त्यांच्याविरोधात कोणीच तक्रारीसाठी पुढे येत नाही. त्यामुळे त्यांनी हे कृत्य केले असून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी देवलत्ती ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे पोलिसांकडे केली आहे. त्यांना तात्काळ अटक न केल्यास देवलत्ती गावातील व्यवहार बंद ठेवून आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. लवकरच संबंधीतांना जेरबंद करण्याचा दावा तपास अधिकारी उपनिरीक्षक एम.बी.बिरादार यांनी केला आहे.
सावित्रीबाईंनी सनातनी व्यवस्थेवर असूड ओढला
वैशाली पाटील यांचे प्रतिपादन; नंदगड जेसीएस शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी खानापूर: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना नेहमीच स्त्रियांची स्थिती बदलायची होती. त्या भारताच्या पहिल्या शिक्षिका बनल्या. बालविवाहामुळे लहान वयातच मुली विधवा होत. बाल विधवांना मुंडन केले जात असे. लैंगिक शोषणही होत असे. सावित्रीबाईंनी त्यांच्यावर होत असलेल्या सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. रुढी-परंपराना विरोध करून अथक परिश्रम […]