जत्त: समोरील टायर फुटून क्रुझर पलटी झाल्याने घडलेल्या अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या. महाराष्ट्रात कामाला निघालेल्या अथनीच्या महिलांवर काळाने घातला. ही घटना जत्तजवळ घडली असून या अपघातात अन्य दहा जण जखमी झाले आहेत.
सदर अपघातात महादेवी चौगुला, गिता दोडमनी, कस्तुरी (तिघीही रा. बळ्ळीगेरी, ता.अथणी) या ठार झाल्या. टायर फुटल्यानंतर क्रुझरने चारवेळा पटली घेत रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. त्यामुळे मृतांच्या डोकीला जबर मार बसला. तसेच अन्य कांही जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर विविध खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. जत्त पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.
सीमाभागातील विद्यार्थ्यांना आवाहन
खानापूर : सीमा भागातील विद्यार्थ्यांना कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात मोफत आणि सवलतीत प्रवेश दिला जाणार आहे. त्याबाबत मंगळवारी (ता. १४ ) खानापूर येथील शिवस्मारक येथे सकाळी साडे दहा वाजता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा खानापूर तालुक्यासह सीमा भागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आले आहे.शिवाजी विद्यापीठतर्फे सिमाभागातील […]