बंगळूर: महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल अश्लिल वक्तव्य केल्याप्रकरणी अटकेत असलेले भाजप आमदार सी. टी. रवी आणखी एका संकाटात सापडले आहेत. या प्रकरणात आता राज्य महिला आयोगाने एन्ट्री मारली असून आज नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे.
याबाबत ‘न्यूज १८ कन्नड’ला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी यांनी माहिती दिली. एक मंत्री म्हणून नाही तर महिलेबद्दल अपसब्द वापरला गेल्याने स्वयंप्ररीत दखल घेत आमदार सी.टी.रवी यांना नोटीस बजावली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. परिणामी, आमदार रवी यांच्यासमोरील संकटात दिवसेदिवस वाढ होत जाणार आहे. आज शुक्रवारी (ता.२०) सायंकाळपर्यंत त्यांना बंगळूर येथील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे.
- काय म्हणाले, डी.के.शिवकुमार..
एखाद्या महिलेला वेश्या संबोधणे ही कुणाची संस्कृती? ही भाजपची, भारताची की चिक्कमंगळूरची संस्कृती? असा प्रश्न उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी व्यक्त केला आहे. १२ वेळा त्या शब्दाचा उच्चार आमदार सी.टी.रवींनी केला आहे. त्याचे पुरावे सभापतींकडे नसतील, तर आम्ही देऊ. पण सभापतींचे वागणेही सभापतींना शोभण्यासारखे नव्हते. त्यांनी विधान परिषदेत यावर चर्चा करण्यास मुभा द्यायला हवी होती, पण त्यांनी तसे न करता सभागृह तहकूब केले. हे अनाकलीन आहे, असेही ते म्हणाले.
खानापूर ‘हेस्कॉम’ला न्यायालयाचा झटका..
समांतर क्रांती / खानापूर शॉर्टर्कीमुळे ऊसाला आग लागलेल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचे आदेश देऊनही दुर्लक्ष केल्याने न्यायालयाने आज शुक्रवारी (ता.२०) हेस्कॉमला झटका दिला. अलिकडेच उद्घाटन झालेल्या हेस्कॉम कार्यालयातील तब्बल चार लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले असून हेस्कॉमवर नामुष्की ओढवली आहे. चिक्कहट्टीहोळ्ळी येथील इरण्णा सन्नकी, बाबू पटगार, सिध्दाप्पा पुजारी आणि इराप्पा दास्तीकोप्प यांच्या ऊसाला शॉर्टसर्कीटमुळे आग […]