समांतर क्रांती / खानापूर
येथील मयेकरनगरातील मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. तसेच जयंतीचे औचित्य साधून दत्त मंदिराचे चौकट पूजन पार पडले. यावेळी मयेकर नगरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दत्त मंदिर चौकट पूजन रामगुरवाडी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी संजीव उप्पीन व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते पार पडले. त्यांचा शिवा मयेकर यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.तसेच दत्त जयंतीनिमित्त निवृत्त जवान परशुराम पाटील दाम्पत्याच्या हस्ते दत्त पूजन करण्यात आले. त्यांचाही मयेकर नगरवासीयांच्या हस्ते ग्राम पंचायतीच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या सौ. ऐश्वर्या मयेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आल.
या वेळी दत्त मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष बसवराज पाटील, सेक्रेटरी के.बी. गावडे, खजिनदार रमेश पाटील, पी. सी.पाटील, लक्ष्मण बंगारी, पी. एन. देसाई, कृष्णा देसाई, गणपती देसाई, प्रल्हाद गुंडपिकर, श्री. नीलजकर, श्री.गुळशेट्टी, श्री.सुभाष गुंडपीकर, नारायण माळवे, प्रियांका कोलेकर तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकदा खाल.. तर पुन्हा-पुन्हा याल..!
समांतर क्रांती / व्यवसायवृध्दी अन्न हे पूर्णब्रम्ह.. ही आपली संस्कृती. याच संस्कृतीला साजेसे उदरभरण करण्यासाठी सध्या खानापुरातील एकमेव ठिकाण म्हणजे बस स्थानकातील ‘हॉटेल गणेश’. हॉटेल व्यवस्थापनाने प्रवाशी आणि खानापूरवासीयासाठी चविष्ठ अशी व्हेज थाळी सुरू केली आहे. ग्राहकांच्या खिशाला परवडेल, अशा किमतीत ही थाळी हॉटेल गणेशमध्ये मिळत असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाने कळविले आहे. नुकताच काँग्रेसच्या राष्ट्रीय सचीव […]