समांतर क्रांती / खानापूर
तीन दिवसांपासून थांबलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये चालकाचा मृतदेह आढळून आल्याने गणेबैल टोल नाका परिसरात खळबळ माजली आहे. मुगुटसाब फकरुद्दीन कोट्टूर (वय ४५, रा. एम.के.हुबळी) असे या चालकाचे नाव आहे. त्या हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
रविवारी (ता.१५) रात्री १२ वाजून १० मिनिटांनी हा ट्रक (के.ए.०१ ए.०९२९) टोलवरून गणेबैच्या दिशेने येऊन जवळच्या हॉटेलसमोर थांबला होता. पण, त्यानंतर आज मंगळवारपर्यंत जागेवरून हलला नाही. त्यामुळे संशय आल्याने टोल कर्मचाऱ्यांनी ट्रकमध्ये पाहिले असता ट्रकच्या केबीनमध्ये मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. येथील आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्यााने झाल्याचे स्पष्ट झाले.
मुगुटसाब हा ट्रकमधून ऊसाची वाहतूक करीत होता. रविवारी रात्री तो एम.के.हुबळीकडे जात असतांना टोल ओलांडल्यानंतर त्याच्या छातीत दुखू लागले असावे, त्यामुळे त्याने ट्रक हॉटेलसमोर थांबविला. पण, त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्याच्या अंगावर कोणत्याच प्रकारच्या जखमा आढळून आलेल्या नाहीत. मृताच्या पत्नीने कोणत्याही प्रकारचा संशय नसल्याचे सांगितल्याने पोलिसांनी नैसर्गिक मृत्यू अशी नोंद केली आहे.अधिक तपास सुरू आहे.
भीमगड वनवासींचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर : मंत्री ईश्वर खांड्रे यांचे पुनर्वसनाचे आश्वासन
समांतर क्रांती / खानापूर भीमगड अभयारण्य आणि वनपरिक्षेत्रात असलेल्या गावांतील रहिवाशांना योग्य पुनर्वसन मोबदला देऊन टप्प्याटप्प्याने स्थलांतरित केले जाईल, असे आश्वासन वने, पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर बी. खांड्रे यांनी दिले आहे. सोमवारी(ता.१६) रात्री मंत्री खांड्रे यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तळेवाडीला भेट दिली आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. प्रत्येक कुटुंबाला सरकार १५ लाख रुपये नुकसान भरपाई […]