समांतर क्रांती न्यूज
मराठी विद्यानिकेतन बेळगाव विद्यार्थी दत्तक योजनेला खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ५००० रुपयांची देणगी दिली. मराठी विद्यानिकेतन बेळगाव विद्यार्थी दत्तक योजनेच्या निधीतून गोरगरीब विद्यार्थी किंवा पालकत्व हरपलेल्या गरजू विद्यार्थ्यांना वार्षिक शैक्षणिक फी भरण्यासाठी मदत केली जाते. सदर योजनेसाठी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी आज गुरुवारी २२ जून रोजी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या मुलीच्या हस्ते ५००० रुपयांची आर्थिक मदत केली. याप्रसंगी शाळेचे उपाध्यक्ष अनंत जाधव, मुख्याध्यापक गजानन सावंत, किरण हुद्दार, रोहन लंगरकांडे व फाल्गुनी धनंजय पाटील उपस्थित होते.
आनंद वार्ता: आजपासून बरसणार पाऊस!
समांतर क्रांती न्यूज बंगालच्या उपसागरातील वारे सक्रिय झाले असून आजपासून (ता.२३) पाऊस बरसणार असल्याची आनंद वार्ता हवामान खात्याने दिली आहे. पर्जन्यवृष्टीला पूरक वातावरण तयार झाले अल्याने उद्यापासून (ता.२४) गोवा, कोकण किनारपट्टी तसेच मध्य महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातही समाधानकारक पाऊस होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. काल गुरूवारी कणकुंबी […]