समांतर क्रांती न्यूज
बेळगाव : विद्यार्थ्यांनी मानसिक ताणतणावातून मुक्त राहून संगणक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपल्या जीवनात यश प्राप्त करावे असे आवाहन प्रमुख पाहुण्या डॅा. सोनाली सरनोबत यांनी केले. डाॅ. सरनोबत दिया इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजीच्या कार्यक्रमात बोलताना केले.
डाॅ सोनाली सरनोबत, संचालिका सोनिया जांग्रा, प्रा पाटील, प्रा गिरण्णावर, हर्षा रगशेट्टी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने 13 व्या वर्धापन दिनाचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी संचालिका सोनिया जांग्रा यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दिया इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी ही संस्था सोनिया जांग्रा यांनी हर्षा रगशेट्टी, अमृता मोरे, पूनम कित्तूर, विजयालक्ष्मी खाडे, रेखा पालेकर यांच्या सहयोगाने चालविली आहे.
संगणक ज्ञानाचे आज जगात अत्यंत महत्व वाढले आहे, यासाठी विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन जी ए. महाविद्यालयाचे प्रा.पाटील व बेननस्मिथचे प्रा.गिरण्णावर यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी सास्कृतिक कार्यक्रम सादर केले. शेवटी हर्षा रगशेट्टी यांनी आभार मानले.
जेष्ठ नागरिक संघटनेची उद्या बैठक
खानापूर:कर्नाटक राज्य ज्येष्ठ नागरिक संघटना तालुका खानापूर घटक पदाधिकारी व जेष्ठ नागरिकांची बैठक उद्या सोमवारी सकाळी 11 वाजता ज्ञानेश्वर मंदिर खानापूर येथे बोलाविली आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.मिटींगचे विषयविश्व योगा दिन साजरा करणेबाबत योगाचे योग गुरु श्रीयुत अरविंद कुलकर्णी खानापूर यांचे मार्गदर्शनाखाली होणार आहे.पुढील सहामाही कार्यक्रमाचे नियोजन करणे.