- खानापूर: सरकारी अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांची कामे निर्धारीत वेळेत केली नसतील, अधिकारी कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी केली जात असेल, मंजूर कामात अडवणूक केली जात असेल किंवा सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांबद्दल कोणत्याची प्रकारची तक्रार असेल, तर तक्रार नोंदविण्याची संधी सर्वसामान्य नागरीकांना मिळणार आहे.Do you have a complaint? Then register ‘here’.
बुधवारी (ता.१५) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत खानापुरातील तालुका पंचायत सभागृहात लोकायुक्त अधिकाऱ्यांची तालुक्यातील सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीला नागरीकांनादेखील पाचारण करण्यात आले असून त्यांनी त्यांच्या तक्रारी लोकायुक्त अधिकाऱ्यांसमोर मांडाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांनीही बैठकीला उपस्थित राहावे, असे लोकायुक्त अधिक्षकांनी कळविले आहे.
खानापूर तालुक्यात आज रविवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित
खानापूर: दुरुस्तीच्या कामासाठी आज रविवारी दिनांक सकाळी 9.00 ते 4.00 या वेळेत खानापूर तालुक्यातील वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. खानापूर शहरासह, शिवाजीनगर, रुमेवाडी, ओतोळी, मोदेकोप, नागुर्डा, रामगुरवाडी, आंबोळी, हरसनवाडी, असोगा, नेरसा, अशोकनगर, मणतुर्गा, शेडेगाळी, हिरेमुन्नोळी, चिकमुन्नोळी, गाडीकोप्प, पारिश्वाड, इटगी, बोगूर, हिरेहट्टीहोळी, चिक्कहट्टीहोळी, करविनकोप, गंदीगवाड, हिरेअंग्रोळी, चिक्कअंग्रोळी, केरवाड, हुलीकोत्तल, इटगी, बोगूर, बेदरहट्टी, […]