खानापूर: उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघात खानापूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रचाराचा धडाका चालविला आहे. त्यांना खानापूर तालुक्याबरोबरच कित्तूर, हल्याळ, कारवार, कुमठा, भटकळ, शिरसी आणि यल्लापूर विधानसभा मतदार संघातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. कारवार आणि शिरसीमधून मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करीत असून यामुळे भाजपच्या नेत्यांना धडकी भरली आहे.
खानापूर तालुक्यात प्रचाराची रणधुमाळी
डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूर तालुक्यातही प्रचाराची रणधुमाळी उठविली आहे. प्रत्येक गावातून त्यांना प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी (ता. १२)) गर्लगुंजी आणि तोपिनकट्टी गावात प्रचार करण्यात आला. यावेळी कोपरासभासह घरघरी जाऊन मतयाचना करण्यात आली. प्रसंगी गर्लगुंजीतील स्वाभीमानी मराठी भाषीकांनी यावेळी डॉ. निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कारवार लोकसभा मतदार संघ आकाराने खूपच मोठा आहे, १४ तालुके या मतदार संघात येतात तसेच आठ विधानसभा मतदार संघाचा मिळून हा लोकसभा मतदार संघ बनला आहे त्यामुळे स्वत: उमेदवारास सगळीकडे प्रचार करणे शक्य नसल्याने खानापूर तालुक्यात प्रचारासाठी वेळ न घालविता बाकी क्षेत्रात प्रचारास जायचे व आपल्या खानापूर तालुक्यातील जनतेने, नेत्यांनी, कार्यकर्त्यांनीच ताईंचा प्रचार करायचा अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले असून याचाच भाग म्हणून काल रात्री गर्लगुंजी तोपीनकट्टी गावातं जाऊन गाठीभेटी घेण्यात आल्या …
यावेळी प्रामुख्याने गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, माजी आमदार कै. वसंतराव पाटील साहेब यांच्या घरी बैठक घेण्यात आली. तसेच पंचायत माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य वंदना अशोक पाटील यांच्या घरी सुद्धा भेट दिली…
ओंकार पतसंस्था व माऊली पतसंस्थेचे अध्यक्ष व संचालकांच्या भेटी घेतल्या यामधे प्रामुख्याने श्रीकांत सावंत, प्रभाकर पाखरे, पुंडलिक वड्डेबैलकर, अर्जुन सिद्धानी, संतोष पाटील, मऱ्याप्पा पाखरे, सोमनाथ येरमाळकर, तसेच पंचायत चे माजी अध्यक्ष व विद्यमान मेंबर श्री हनुमंत मेंगले, सुरेश मेलगे वगैरे उपस्थित होते…
याप्रसंगी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्या प्रभागामधील तरूण व जेष्ठ नागरीकांच्या भेटीगाठी घेतल्या. अध्यक्ष ललिता कोलकार, रेखा कुंभार, उपाध्यक्ष रेखा कुंभार, सदस्या अन्नपुर्णा बुरूड, सविता सुतार आणि वंदना पाटील या महिला संदस्यांची भेट घेऊन चर्चा केली. या सदस्यांनी आम्ही डॉ.निंबाळकर पाठी खंबीरपणे उभे रहाणार असल्याचे सांगितले व गावात प्रचार सुद्धा करणार असल्याचे सांगितले.
गर्लगुंजी पीकेपीएसचे अध्यक्ष राजू सिद्धानी, हनुमंत मेलगे, मर्याप्पा पाखरे, पुंडलिक वड्डेबैलकर, रोहन पाटील यांनी आपापली मते मांडतांना पाठींबा जाहीर केला.
तोपिनकट्टीतही झंझावात
तोपिनकट्टी येथे गजानन खांबले यांच्या घरी जाऊन तेथील लोकांशी संवाद साधला. यावेळी ॲड. ईश्वर घाडी, महादेव कोळी, प्रसाद पाटील, लक्ष्मण कसर्लेकर, सुरेश दंडगल, प्रमोद सुतार महादेव घाडी, जोतीबा गुरव व महादेव गुरव, नारायण खानापूरी, गोपाळ गुरव, तोहीत चादखण्ण्वर, संतोष पाटील, विनोद कुंभार, रोहन पाटील, कल्लाप्पा लोहार, संघाप्पा कुंभार, साईश सुतार, सुर्यकांत कुलकर्णी, विशाल देसाई आदी उपस्थित होते.
मोदींच्या नावे मते मागतांना भाजप नेत्यांना लाज वाटायला हवी
कारवार: भाजपने देशभर नौटंकी चालविली आहे. खोटे बोलल्याशिवाय भाजपच्या नेत्यांचा दिवस जात नाही. त्यामुळे कर्नाटकातील जागृत मतदारांनी भाजपला नाकारले. यावेळी देशही भाजपला नाकारेल. विकास किंवा पायाभूत योजनांचा थांगपत्ता नाही. देशातील गोर-गरिब जनता रस्त्यावर आली आहे, तरीही भाजपला पुन्हा एक संधी हवी आहे. केवळ मोदींच्या नावावर मते मागतांना या भाजपच्या नेत्यांना लाज वाटायला हवी, असा घणाघात […]