बागेवाडी: हुबळी येथील नेहा हिरेमठ हिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी निषेध वक्य केला. चिक्कबागेवाडी येथे त्यांनी नेहाला श्रध्दांजली वाहतांना भाजपवर शरसंधान साधले. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर त्यांनी तोफ डागली.
नेहा ही तरूणी कॉलेजमध्ये शिकत असतांना तिच्याच कॉलेजमधील तरूणाकडून तिच्यावर हल्ला झाला. सरकारने आरोपीला तात्काळ जेरबंद करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली असतांनाही भाजपच्या नेत्यांकडून त्याचे राजकारण होत असेल तर ही शोकांतिकाच म्हणावी लागले. कथुआ घटना भाजपच्या काळात घडली. ऑलंपिकसारख्या जागतिक क्रीडा स्पर्धातील महिला स्पर्धकांवर अन्याय झाला. त्यावेळी भाजपच्या नेत्यांची तोंडं शिवली होती का? असा प्रश्न डॉ. निंबाळकर यांनी उपस्थित केला.
नेहाच्या हत्येचे दु:ख आम्हालाही आहे. सरकार सर्वपरीने आरोपींना शासन करण्यासाठी सज्ज आहे. तरीही अशा गोष्टींचे राजकारण केवळ भाजपचे नेतेच करू शकतात. भाजपच्या नेत्यांवरच महिलांवरील अत्याचाराचे आरोप आहेत, त्यांच्याबद्दल हे कधी बोलणार? असा सवाल करीत डॉ. निंबाळकर यांनी थेट माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्यावर शरसंधान साधले. प्रसंगी मयत नेहाला श्रध्दांजली वाहण्यात आली. तत्पूर्वी गावातून कॅडल मार्च काढण्यात येऊन या घटनेचा निषेध करण्यात आला.
कारवार लोकसभा: १३ उमेदवारी अर्ज वैध, डॉ. निंबाळकर एकमेव महिला
कारवार: लोकसभा निवडणुकीसाठी २० जणांनी ३६ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १४ जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले असून सहा जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. उद्या सोमवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.एकुण उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर या एकमेव महिला आहेत. होन्नावरच्या रुपा गजानन नाईक यांनीही अर्ज दाखल केला […]