समांतर क्रांती / विशेष
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचीवपदावर कार्य करणे साधेसुधे नाहीच. कारण, त्यासाठी अनेक राज्यांच्या समित्यांशी संबंध येतो, वेगवेगळ्या लोकांशी, विविध जाती – धर्माच्या लोकांशी, सर्वसामान्यांशी संबंध येतो. त्यासाठी प्रत्येक प्रदेशातील रुढी-परंपरा, तेथील संस्कृती समजून घेणे, प्रत्येक समाजात मिसळणे आगत्याचे ठरते. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून येथील माजी आमदार आणि अखिल भारतीय कमिटीच्या सचीव तसेच गोवा, दिव-दमनच्या प्रभारी डॉ. सौ. अंजली हेमंत निंबाळकर यांनी अनेक प्रदेशांना-देवस्थानाना भेटी दिल्या आहेत. त्याचा घेतलेला हा आढावा..
काँग्रेसचे नेते म्हणजे हिंदूविरोधीच असतात, या विरोधकांच्या आरोपांना डॉ. अंजली निंबाळकर यांनी छेद दिला आहे. त्या खानापूरच्या आमदार असतांना तर पती राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक व माहिती खात्याचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांच्यासमवेत बंगळूर ते तिरुपती असा २७५ कि.मी. पायी प्रवास करून त्यांनी तिरुमलाचे दर्शन घेतले होते. त्यावेळी त्यांनी खानापूर तालुक्याच्या विकासाची कामना तिरुपती बालाजीकडे केली होती. त्यावेळी त्यांच्या या पदयात्रेची दखल कर्नाटकातील सर्वच वृत्तपत्रांसह माध्यमांनी घेतली होती. त्यानंतरही त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसमवेत अनेकवेळा तिरुपतीची यात्रा केली आहे.

अलिकडेच डॉ. निंबाळकर यांनी महाकुंभ मेळाव्यात सहभागी होत. अभंग्यस्नान केले. यावेळीही त्यांच्यासमवेत राज्याचे वरिष्ट आयपीएस अधिकारी असलेले पती हेमंत निंबाळकर त्यांच्यासमवेत होते. तत्पूर्वीच त्यांनी अष्टविनायक दर्शन घेतांना महागणपतींचे महात्म्य समजून घेतांना महाराष्ट्रीय संस्कृतीशी असलेली सांस्कृतिक विण नव्याने घट्ट केली. ज्योतिर्लिंग दर्शन, पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन तसेच जेजुरीचा खंडोबांचे दर्शन हा तर त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. खरं तर हा विषय नाहीच, हा खराखुरा जिव्हाळा आहे. श्रध्दा आहे. हिंदू संस्कृतीची मिळालेली शिकवण आहे. देण आहे. परंपरेचा वारसा आणि वसा आहे, असे डॉ. अंजली मानतात.

देशभरातील अनेक देवस्थानांना भेटी देतानाच त्यांनी राज्यातील विविध देवस्थानांना देखील अव्हेरलेले नाही. त्यांनी अनेक मठांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. अनेक मठाधिशांचे आशिर्वाद त्यांनी घेतले आहेत. त्यांनी बेळगाव जिल्ह्याचे आराद्य दैवत यल्लम्मादेवी यासह खानापूर तालुक्यातील पाच मठांना भेटी दिल्या आहेत. त्यांच्या आमदारकीच्या काळात तेथील विकास कामांना निधी मिळवून दिला आहे. तालुक्यातील मंदिरांसाठीही त्यांनी देणग्या-शासकीय निधी दिला आहेच. विशेष म्हणजे तालुक्यातील यात्राही त्या चुकवित नाहीत. याबद्दल त्या सांगतात, या यात्रा-जत्रातून लोकसंस्कृतीची ओळख होते. जनसामान्यांशी संवाद साधता येतो.

अखील भारतीय काँग्रेसच्या सचिवपदाची जबाबदारी अंगावर पडल्यानंतर तर त्यांनी अनेक राज्यांतील देवस्थानांना भेटी दिल्यात, पूजा-अर्चा, यात्रांमध्ये सहभाग दर्शविला आहे. या निमित्ताने भारत देश आणि येथील हिंदू संस्कृती समजून घेण्याची संधी यानिमित्ताने हे त्या सांगतात, तेव्हा काँग्रेसजन हिंदूविरोधी असल्याचा केला जाणारा कांगावा फुकाचा असल्याची प्रचिती येते.

११ केंद्र..१७४ खोल्यांमधून ३८८३ विद्यार्थी देणार दहावीची परिक्षा
समांतर क्रांती / खानापूर आजपासून दहावीच्या परिक्षेला सुरूवात होत आहे. यावेळी तालुक्याचा निकाल ८५ टक्के लावण्याचे उद्दीष्ट खात्याने ठेवले आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधांसह कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती क्षेत्र शिक्षणाधिकारी पी. रामप्पा यांनी ‘समांतर क्रांती’ला दिली. असे असेल नियोजन: परिक्षा केंद्र : ११ खानापूर शहरात मराठा मंडळ, ताराराणी हायस्कूल आणि सर्वोदय हायस्कूल ग्रामीण […]