उमेदवारी अर्ज दाखल; ‘कारवार’मधून भाजपला हद्दपार करण्याचा निर्धार
कारवार: काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी आज मंगळवारी (ता.१६) येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा पालक मंत्री ममकाळू वैद्य, माजी मंत्री आर.व्ही.देशपांडे, आमदार भिमान्ना नाईक, आमदार बाबासाहेब पाटील आमदार सतिश सैल उपस्थित होते.
अर्ज दाखल करण्यापूर्वी डॉ. निंबाळकर यांनी नेत्यांसमवेत श्री सिध्दीविनायकाचे दशरन घेतले. त्यानंतर रॅलीने जाऊन अर्ज दाखल केला. यावेळी रॅलीत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात महिलांची संख्या लक्षणीय होती. कार्यकर्त्यांनी डोकीवर भगवे फेटे परिधान केले होते, त्यामुळे आवघे कारवार आज भगवेमय झाले होते. तसेच जोरदार घाषणाबाजी करीत रॅली काढण्यात आली. उत्तर कन्नड लोकसभा मतदार संघातून भाजपला हद्दपार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात येत होता.DR ANJALI NIMBALKAR FILLED HER CANDIDOCY APPLICATION.
उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर, आर.व्ही.देशपांडे, पालकमंत्री मंकाळू वैद्य यांनी मतदारांना अभिवादन करीत यावेळी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. सर्वसामान्य मतदार डॉ. निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांना विजयाची खात्री देत होते. एकंदर यावेळी अनेक भाजप कार्यकर्त्यांनीदेखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
कारवार, कित्तूर, हल्याळ, कुमठा, भटकळ, शिरसी, यल्लापूर या विधानसभा मतदार संघातील नेते एकजुटीने अर्ज दाखल करण्यासाठी रॅलीत सहभागी झाले होते. तसेच कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. खानापूर तालुक्यातून २ हजारहून अधिक नेते-कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेस नेते विवेक हेब्बार, निवेदीत अल्वा, जिल्हाध्यक्ष साई गावकर यांच्यासह सर्व तालुका ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
उन्हाचा तडाखा; तरीही कार्यकर्ते खंबीर
कारवारमध्ये दमट वातावरणामुळे आज प्रचंड उष्मा होता. अंगाची लाही-लाही होत असतांनाही कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. परिसर दणाणून सोडणाऱ्या घोषणा दिल्या जात होत्या. काँग्रेसचा कार्यकर्ता हा सामान्य आहे. तो मोडेल पण वाकणार नाही. त्यामुळेच आपल्या उमेदवारासाठी इतका प्रचंड उष्मा सहन करीत तो रॅलीत सहभागी झाला आहे. काँग्रेसच्या विजयाचे हे द्योतक असून यावेळी भाजप हद्दपार होणारच, असा विश्वास माजी मंत्री आर.व्ही.देशपांडे यांनी व्यक्त केला.
अनंतकुमार हेगडेंची ८५ दिवस दांडी; केवळ १४ प्रश्न
खासदारांचे रिपोर्ट कार्ड / समांतर क्रांती ब्युरो खासदार अनंतकुमार हे देशातल्या निष्क्रीय खासदारांपैकी एक असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षातील त्यांची संसदेतील कामगिरी अत्यंत सुमार राहिली आहे. एकीकडे संसदेत निष्क्रीय असतांनाच त्यांनी मतदार संघातील जनतेशीदेखील संपर्क ठेवला नाही. त्यामुळेच भाजपने त्यांना नारळ देत घरी बसविले आहे. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो, याचा […]