समांतर क्रांती वृत्त
खानापूर: राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधकांच्या बुडाला जणू आग लागली होती. पाच योजना कशा राबविणार असा प्रश्न विचारीत मोर्चे आंदलने केली जात होती. पण, आज त्याच योजनांचा लाभ घेऊन राज्यातील जनता खूष आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायलाही जागा राहिलेली नाही. जनतेची दिशाभूल करण्यात भाजपचे नेते कोणत्या थराला जातात, हे जनतेला समजले आहे. पण, आम्ही अभिमानाने सांगतो, काँग्रेस है तो सब मुमकीन है, असे मत माजी आमदार आणि काँग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्या डॉ. अंजली निंबाळकर यांनी ‘समांतर क्रांती’शी बोलतांना व्यक्त केले.
गृहज्योती योजनेचा सर्वाधिक लाभ खानापूर तालुक्यातील नागरीकांनी घेतला आहे. हेच आमचे यश आहे. काँग्रेसच्या सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या योजनांमुळे विरोधकांची तंतरली आहे. त्यांना काँग्रेसविरोधात ब्र काढयलादेखील संधी नाही. त्यामुळे दिल्लीच्या वाऱ्या करून विकास साधण्याच्या गप्पा मारल्या जात आहेत. प्रत्यक्षात नऊ वर्षे केंद्रात भाजपची सत्ता असतांना खानापूर तालुक्यात एकही केंद्राची योजना आली नाही. गेला बाजार वनकायद्यामुळे रखडेली कामेदेखील त्यांना करता आलेली नाहीत. आम्ही हरेक प्रकारे तालुक्यातील अशा समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. पण, केंद्राची भिती दाखवून कामे रखडवली गेली. आता मात्र राज्यात काँग्रेसचे आणि सर्वसामान्य जनतेचे राज्य आहे. लोकशाही राज्य आहे. त्यामुळे प्रत्येक गावात विकास साधण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत, असे त्या म्हणाल्या.
खानापूर तालुक्यात हेस्कॉमचे एकूण ग्राहक आहेत ६२१८५ यापैकी ६१८७७ म्हणजेच जवळ-जवळ ९९% लोकांनी गृहज्योती योजनेसाठी अर्ज केले असून यापैकी ५११०१ ग्राहकांना म्हणजेच ८२% लोकांना या योजनेचा लाभ झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. तालुका काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही गृहलक्ष्मी आणि इतर योजनांदेखील सक्षमपणे राबविण्यावर भर देत आहोत. या योजनांमध्येदेखील खानापूर तालुका आघाडीवर राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकांनंतर अंजलीताई गायब झाल्या, अशा वावड्या विरोधक उठवत आहेत. प्रत्यक्षात मात्र सर्वसामान्य जनतेची कामे आम्हीच करीत असून केवळ राजकारण हा आमचा अजेंडा कधीच नव्हता. खानापूर तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असल्याने पुन्हा आम्ही त्याच उमेदीने तालुक्यातील जनतेच्या सेवेत कार्यरत आहोत. तुम्ही कितीही दिल्लीच्या वाऱ्या करा, तालुक्याच्या विकासात आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यात केवळ आणि केवळ काँग्रेसचेच योगदान असेल, असे त्यांनी विरोधकांना सुनावले आहे. काँग्रेस है तो सब मुमकीन है , हे तालुक्यातील जनतेला कळून चुकले आहे, आगामी काळ आपला असेल यात वाद नाही, असेही त्या म्हणाल्या. लवकरच तालुकावासीयांना गोड बातमी मिळेल, असे सांगत त्यांनी तालुकावासीयांची उत्सुकता वाढविली आहे.
पुढील लढा उच्च न्यायालयात
बेळगाव: जानेवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले होते. १६ जानेवारी २०२२ रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला होता. त्यावेळी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. माजी आमदार अनिल बेनके व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे […]