मेस्ता मृत्यू प्रकरणावरून डॉ. निंबाळकर कडडल्या: दंगलीना कागेरीच जबाबदार
कारवार: परेश मेस्ता या तरुणाच्या मृत्यूचे राजकारण करून तुम्ही आमदारकी मिळवली.तुम्ही गरिबांची घरे, दुकाने, सरकारी मालमत्ता जाळली. यात अनेक निष्पाप तरुण होरपळले, त्यांचे संसार उध्वस्त झाले. त्यावेळी तुम्ही मैदान सोडून पळाला. आता हे आगी लावण्याचे धंदे बंद करा, अशा शब्दात काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी विश्वेश्वर हेगडे – कागेरी यांना झापले. तुम्हाला जनतेने चांगले ओळखले आहे, त्यामुळे तुमची सुट्टी नक्कीच होणार. कारवार मतदार संघात काँग्रेसला विजयी करण्याचा निर्धार जनतेने केला आहे, असेही त्या म्हणाल्या.
2017 मध्ये होन्नावर येथे परेशाचा मृतदेह आढळला होता. त्यावेळी कागेरी यांनी त्या घटनेचे राजकारण करीत जातीय दंगली घडवून आणल्या होत्या. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तत्कालीन पोलीस महानिरीक्षक व सध्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हेमंत निंबाळकर यांच्याकडे परिस्तिथी नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सोपावली होती. त्यावरून कागेरी यांनी नुकताच टिप्पणी केली. त्याला प्रत्युत्तर देताना डॉ. निंबाळकर या भाजपच्या जातीयवादी धोरणावर कडडल्या.
मेस्त प्रकरणाचा फायदा आपल्या स्वार्थासाठी करून घेणाऱ्या कागेरी यांनी निष्पाप तरुणांना वाऱ्यावर सोडून पोलीस गाडीतून पळ काढला होता. असे हे पळपुटे कागेरी आता खोटे आरोप करून सहानुभूती मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपदेखील डॉ. निंबाळकर यांनी केला. मेस्त याचा मृत्यू नैसर्गिक होता, असे सीबीआयच्या तपासात निष्पन्न झाले. खरंतर कागेरी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता, त्याउलट श्री. हेमंत निंबाळकर यांच्यावर कागेरी यांनी गुन्हा दाखल केला. आम्ही त्यासाठी लढा दिला, मेस्तच्या कुटुंबियांना दिलासा दिला. तुमच्यासारखे पळून गेलो नाही, असेही त्यांनी सुनावले.
सहा वेळा आमदार आणि मंत्री राहिल्याच्या फुशरक्या मरण्यापेक्षा तुमच्या पापांची उजळणी करा, असा सल्ला देतानाच तुम्हाला जनतेने चांगलेच ओळखले आहे. तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यामुळेच तुम्ही प्रधानसेवाकासारखे बरळत आहात, अशी कोपरखळी मारायलाही त्या विसरल्या नाहीत.
भाजप जातीचे राजकारण करत आहे. हिंदू-मुसलमान तरुणांची दिशाभूल केली जात आहे. भाजप फक्त ‘श्री राम’ म्हणते पण ‘जय सिया-राम’ म्हणत नाही’ कारण भाजप महिलेचा आदर करत नाही, जन्म दिलेली आई नको? असे करून भाजप हिंदू धर्म बिघडवत आहे.
मी छत्रपती शिवाजी महाराजांची वैचारिक वारसदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीं सांगितल्या आहेत, त्यात मराठा ,मुस्लीम,ख्रिश्चन,सिख, इसाई, एसी, एसटी आहेत. तो हिंदू धर्म बिघडविण्यासाठी आपल्या राजकीय स्वार्थासाठी भाजप हिंदूंचा वापर करत आहे. जर तुमचे घर तुमच्या मुलांचे भविष्य चांगले व्हायचे असेल तर या धर्माचे राजकारण करणाऱ्या भाजप पासून दूर रहा आणि कॉंग्रेसला आपल्या आणि आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी मतदान करण्याचे आवाहन अंजली निंबाळकर यांनी कारवार येथील सभेत बोलताना केले.
One thought on “जाती-धर्मावरून आग लावण्याचे धंदे बंद करा : डॉ. निंबाळकरांनी कागेरीना झापले”