- डॉ. अंजली हेमंत निंबाळकर, खानापूर तालुक्याच्या माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव आहेत
कृती शब्दांपेक्षा मोठी असते; अशाप्रकारे ज्यांनी सर्वाधिक टीका सहन करून सर्वाधिक काम करून दाखवणारे नव्या भारताचे शिल्पकार म्हणजे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग.त्यांचे नुकताच निधन झाले. त्याबद्दल त्यांना वाहिलेली ही शब्द सुमनांजली..!
ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलण्याइतपत आपण मजबूत आहोत, याचे कारण डॉ.मनमोहन सिंग. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीद्वारे गाव-खेड्यातील गोरगरिबांना १०० दिवसांचा रोजगार मिळवून देण्याच्या महत्कार्याचे प्रेरणास्त्रोत सुध्दा डॉ. सिंग हेच आहेत. रेशनकार्डद्वारे धान्य वितरीत करून गोरगरिबांची भूक भागवण्यात सिंग यांचे मोलाचे योगदान आहे. सिंग यांनी १४ वर्षाखालील मुलांसाठी मोफत शिक्षण (आरटीई), सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांना बळ दिले. सरकारी यंत्रणेतील पारदर्शकता आणण्यात त्यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे.
आता आपल्याकडे पदवी असूनही आपण स्वतःला एक महान प्रतिभावंत समजतो. पण डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यावेळी केंब्रिज आणि ऑक्सफर्ड या दोन प्रतिष्ठित विद्यापीठांतून शिक्षण घेतले होते आणि ते मोठे विद्वान पण विनम्र होते. त्यांनी अर्थव्यवस्थेतील जवळपास सर्वच उच्च पदे भूषवली आणि त्या पदांचा आदर सुध्दा राखला. केवळ भारतच नाही, तर महासत्ताक अमेरिकेनेही आर्थिक संकटात सापडल्यावर त्यांच्याकडून आर्थिक सल्ले घेतले. असे हे महान अर्थतज्ज्ञ असल्याचा आपल्याला भारतीय म्हणून गर्व असायला हवा.
डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री, नंतर पंतप्रधान या नात्याने या देशासाठी जे प्रकल्प राबवले, ते भविष्यातील भारताचे संचीत आहेत. ‘अपघाताने’ पंतप्रधान झाल्याचा आव आणणाऱ्यांना त्यांनी ही संधी निर्माण करावी लागते. आणि संधीचं सोन करण्याची ताकद आपल्यात असावी लागते, हे त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. कदाचित ते पंतप्रधान नसते तर भारत हा आजचा देश नसता, हे कुणीही मान्य करील. मराठीत एक म्हण आहे, ‘नाण्यांचा आवाज फार होतो, पण त्यांची किंमत आवाज न करणाऱ्या नोटांहून कमी असते’ अगदी तसेच डॉ. मनमोहन सिंग हे व्यक्तिमत्व होते.
देशसेवेला देवाचे कार्य मानून डॉ. सिंग यांनी केलेल्या कार्याचे स्मरण आज संपूर्ण देश आणि जगातील मोठी राष्ट्रे करीत आहेत, त्यांच्या कार्याची प्रशंसा सर्वच स्तरातून होत आहे, यावरून त्यांची निष्ठा, कार्यकुशलता आणि ते किती प्रभावी होते याची कल्पना येऊ शकते. डॉ. सिंग यांच्या कार्याची अत्यल्प माहिती भारतीयांना आहे. कारण, त्यांनी प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा शांतपणे काम केले.त्यासाठी त्यांनी मौनधारण केले. त्यांच्यावर त्यावरून टीका सुध्दा झाली. तथापि, त्यांच्यावर टीका करणारे लोक अधिक आहेत. ते सत्तेत असताना आणि सत्तेतून बाहेर पडल्यानंतरही टीका करणाऱ्यांनी त्यांची पाठ सोडली नाही.
“आजची माध्यमे, विरोधकांपेक्षा, इतिहास माझ्यावर दया करेल,”असे डॉ. मनमोहन सिंग म्हणाले होते. ते ऐकून आणि वाचून खरंच डोळ्यात पाणी तरळले. सिंग सर, इतिहासाला तुमची दया येईल. हे राष्ट्र. हे जग तुमच्यासारख्या अर्थतज्ज्ञांना कधीच विसरणार नाही… भावपूर्ण श्रध्दांजली..!
सहकार चळवळ समृध्द करणारी संस्था: जांबोटी पतसंस्था
खानापूर तालुक्याच्या सहकार चळवळीला शतकोत्तर परंपरा लाभलेली आहे. सावकार-जमिनदारांच्या ‘ॠणा’त राहून पिचलेल्या या तालुक्यातील जनतेला याच सहकार चळवळीने जगण्याचे बळ दिले. जरी या चळवळीला शतकोत्तर परंपरा असली तरी, खऱ्या अर्थाने या चळवळीचा सुर्योदय झाला तो जांबोटी येथील पहिल्या पतसंस्थेच्या स्थापनेनंतरच. १९९५ साली ज्या काळात अजुनही संपूर्ण तालुक्यात मुलभूत सुविधा म्हणाव्या तशा पोहचल्या नव्हत्या अशा विलास […]