माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन
दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे आज निधन झाले. एम्स रुग्णालयात वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना सायंकाळी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर प्रारंभी घरीच उपचार करण्यात आले पण त्याचा उपयोग ना झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री 9.51 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने राजकारणासह विविध क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हत्ती चक्क गावाच्या वेशीत ; मुक्तसंचारामुळे दहशत
समांतर क्रांती / खानापूरशिवारात हैदोस घातलेल्या हत्तीनी थेट सावरगाळी गावाच्या वेशीपर्यंत मजल मारली आहे. हत्ती मुक्तसंचार करीत असल्याने ग्रामस्थात दहशत पसरली आहे. हत्ती चवताळले असून एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी हत्तीना हुसकावून लावण्याची मागणी होत आहे. गेला आठवडाभर चार हत्तीचा कळप सावरगाळी परिसरात शिवारात तळ ठोकून आहे. आठवड्यात दोन वेळा हत्तीनी ज्ञानेश्वर जायप्पा पाटील यांच्या ऊसाचे तसेच […]