खानापूर: काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारत डॉ. अंजली निंबाळकर यांचा उद्या रविवारी (ता. २१) पूर्व भागासह करंबळ येथे प्रचार दौरा आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी तोलगी, गंदिगवाड, सुरपूर-केरवाड, कक्केरी यासह सायंकाळी करंबळ येथे प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम असा..
सकाळी ९.३० वाजता – तोलगी
सकाळी १०.३० वाजता – गंदिगवाड
दुपारी १२ वाजता – सुरपूर-केरवाड
दुपारी १ वाजता – कक्केरी
संध्याकाळी ८ वाजता – करंबळ
.. अन् डॉ. अंजली निंबाळकर कडाडल्या!
बागेवाडी: हुबळी येथील नेहा हिरेमठ हिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी निषेध वक्य केला. चिक्कबागेवाडी येथे त्यांनी नेहाला श्रध्दांजली वाहतांना भाजपवर शरसंधान साधले. प्रत्येक गोष्टीचे राजकारण करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर त्यांनी तोफ डागली. नेहा ही तरूणी कॉलेजमध्ये शिकत असतांना तिच्याच कॉलेजमधील तरूणाकडून तिच्यावर हल्ला झाला. सरकारने आरोपीला तात्काळ जेरबंद करून त्याच्यावर […]