समांतर क्रांती वृत्त
कॅसलरॉक: ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटामुळे संपूर्ण देशात प्रसिध्दीस पावलेल्या दूधसागर धबधब्याचे दर्शन सध्या दुर्मिळ झाले आहे. कारण, गोवा सरकारच्या वनखात्यासह रेल्वे खात्यानेदेखील धबधब्याला जाण्यावर बंदी घातली आहे. गेल्या शनिवारी आणि रविवारी दुधसागर बघण्यासाठी शेकडो पर्यटक गेले होते. त्यांना रेल्वे पोलिसांनी चक्क उठाबशा काढण्याची शिक्षा देत त्यांना वापस धाडल्यामुळे पर्यटकांचा निरस झाला. दूधसागर बघण्यासाठी अट्टाहास करणाऱ्यांवर रेल्वे कायदा कलम १४७ नुसार कारवाई करण्याचा इशारा रेल्वे खात्याने दिला आहे. ब्रगांझा घाटात कुठेही रेल्वे थांबणार नाही, किंवा थांबविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची ताकिद रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
सततच्या अपघतांमुळे करंजोळ वन परिक्षेत्र आणि रेल्वे विभागाने दूधसागर धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना जाण्यास मज्जाव केला अअहे. तरीही मोठ्या संख्येने पर्यटक धबधब्याच्या ठिकाणी जाऊन हुल्लडबाजी करीत आहेत. गेल्या शनिवारी आणि रविवारी सुमारे पाचशेहून अधिक पर्यटक दाखल झाले होते. त्यांना उठाबशा काढण्याची शिक्षा देत पुन्हा धबधब्याकडे न फिरकण्याची सूचना करण्यात आली. यापुढे येथे याल तर उठाबशा कराव्या लागतील, असा समजुतीचा सल्ला देण्यात आला.
खानापूर तालुक्यातील ४० गावांना बेटाचे स्वरूप
समांतर क्रांती वृत्त 40 villages in Khanapur taluka are island-like खानापूर: मणतर्गेजवळच्या पुलावर आज दुसऱ्या दिवशीही पाणी आल्यामुळे शिरोली भागातील अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे सुमारे ३० ते ४० गावांना बेटाचे स्वरूप आले आहे. मणतुर्गेसह विविध पुलांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहतूक बंद करण्यात आली […]