समांतर क्रांती न्यूज
कारवार: कुमठा आणि शिरसी परिसरातील पश्चिम घाटात काल रविवारी भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याने नागरीक हवालदिल झाले आहेत. सुमारे ३ सेकंद मोठ्या आवाजासह भूकंपाचे धक्के बसल्याचे सांगितले जात असून यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण आहे.erthquake
रविवारी अचानक उत्तर कन्नड जिल्ह्यातील कुमठा आणि शिरसी परिसरात कांही काळ जमिन हलल्याचा भास स्थानिकांना झाला. कुमठा-शिरसीदरम्यान सध्या सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. रस्ता कामासाठी दगड फोडण्यासाठी जिलेटीन बाँब लावला गेला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, हिंदी महासागरात सुमारे १० कि.मी.अंतरावर भूकंपण होऊन लाठांनी रौद्ररुप धारण केले होते. त्यामुळे हा भूकंपाचाच धक्का होता हे निश्चित झाले.
कुमठा-शिरसी परिसरात जेथे भूकंपाचे धक्के बसले आहेत, त्याच परिसरात कैगा अणुउर्जा प्रकल्प असल्याने मोठा धोका आहे. परिणामी, नागरीकांत भितीचे वातावरण आहे.
अस्वलांच्या हल्ल्यात माण येथील शेतकरी गंभीर जखमी
प्रसंगावधान राखल्याने पत्नी बचावली समांतर क्रांती न्यूजजांबोटी : कणकुंबी वनपरीक्षेत्रातील माण गावात दोन अस्वलांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना आज घडली. सखाराम महादेव गावकर (वय 63) असे त्यांचे नाव असून त्यांच्या पत्नी या हल्ल्यातून नशिबाने बचावल्या आहेत.याबाबतची अधिक माहिती अशी, सखाराम व त्यांची पत्नी गावापासून जवळच असणाऱ्या त्यांच्या शिवारात कामात व्यस्त होते. अचानक दोन […]