भटकळचे नेते शहाबंदरी काँग्रेसवासी; भाजपला धक्का
कुमठा: निधर्मी जनता दलाचे खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्या महिलांवरील अत्याचार प्रकरणाचा इफेक्ट पक्षावर होत आहे. त्याचाच परिपाक म्हणून उत्तर कन्नड (कारवार) जिल्ह्यातून मोठ्या संख्येने निजद नेते आणि कार्यकर्ते काँग्रेसचा हात धरत आहेत. त्याचा फटका भाजपच्या उमेदवारालादेखील बसणार असून काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर यांच्या विजयाचा मार्ग मात्र सुकर झाला आहे.
शुक्रवारी (ता. ०३) कुमठा येथे प्रजाध्वनी (जनतेचा आवाज) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्या उपस्थितीत भटकळमधील निजदचे प्रभावी नेते इनायतुल्ला शाहबंदरी यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. इनायतुल्ला यांनी यापूर्वी विधानसभेची निवडणूक लढविली असून ते तनजीम या मुस्लीम संस्थेचे अध्यक्ष आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे निजदला मोठे खिंडार पडले आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि उपमुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले.
केवळ भटकळमधीलच नाही तर संपूर्ण कारवार जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी निजदची साथ सोडून काँग्रेसचा हात धरला आहे. मुळातच भाजपशी युती केल्यानंतर नेते-कार्यकर्त्यांत नाराजी पसरली होती. आता प्रज्वल रेवन्नाचे महिलांवरील अत्याचार प्रकरण उघडकीस आल्याने त्याचा परिणाम जिल्हाभर दिसून येत आहे. जे नेते-कार्यकर्ते निजदमध्ये अजूनही आहेत, ते भाजपला मतदान करणार नाही, असे स्पष्टपणे सांगत असल्याने भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांची चांगलीच गोची झाली आहे. एकतर भाजपमध्ये टोकाची नाराजी आहे, त्यात आता निजदच्या महत्वाच्या कार्यकर्त्यांनीही साथ सोडल्याने त्यांचा पराभव निश्चित झाला असल्याचे यादरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साई गावकर यांनी म्हटले आहे.
लोंढा येथील भाजप-निजद पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
खानापूर: तालुक्यातील भाजपचा प्रभाव असलेल्या लोंढा येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज शनिवारी (ता.०४) काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भाजप नेते चांगलेच हवालदिल झाले आहेत. यावेळी निधर्मी जनता दलाच्या कांही कार्यकर्त्यांनीदेखील काँग्रेसचा हात धरून पक्षाला धक्का दिला आहे. BJP-JDS functionaries from Londha joined Congress. लोंढा येथील बेन्नी पिंटो यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे एस.टी.मोर्चा अध्यक्ष जयवंत नाईक, भाजप दलित मोर्चा […]