
समांतर क्रांती / खानापूर
तीन महिन्यांपासून जळगे गावाच्या परिसरात ठाण मांडून लाखो रुपयांचे नुकसान केलेल्या टस्कराला जेरबंद करून त्याची शिमोगा जिल्ह्यातील सक्रेबैल हत्तींच्या शिबीरात रवानगी करण्यात आली. पण, एवढ्याने तालुक्यातील हत्ती समस्या सुटलेली नाही. अद्यापही गुंजी, नंदगड वनविभागात दोन कळपांनी उच्छांद मांडला आहे. खानापूर शहरापासून आवघ्या तीन कि.मी. अंतरावरील कौंदल येथे हत्तींच्या कळपाने सोमवारी (ता.१३) मोर्चा वळविला आहे.
हत्तींचा कळप कौंदलात दाखल..

सोमवारी रात्री हत्तींच्या एका कळपाने कौंदलचे शेतकरी नागेश भोसले यांच्या शेतातील नारळ-केळीची झाडे मुळापासून उखडून टाकली आहेत. तसेच शेती आवजारांचे सुध्दा नुकसान केले आहे. या कळपात तीन हत्तींचा समावेश असल्याचे नागेश भोसले यांनी सांगितले. या घटनेची माहिती वनखात्याला देण्यात आली आहे. त्यामुळे अगदी लोकवस्ती जवळ आलेल्या या हत्तींचा वनखाते कसा बंदोबस्त करणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
नागरगाळीतून शहराच्या वेशीत..

सध्या हौदोस मांडलेले हत्तींचे दोन्ही कळप हे नागरगाळीतून शिंदोळी, कापोली, कामतगा, असा प्रवास करीत गुंजी वनविभागात दाखल झाले. त्यातील एक कळप माणिकवाडी, नायकोलमधून सावरगाळीत स्थिरावला होता. तर दुसरा कळप नंदगड डॅम परिसरात गेला होता. यातील एक कळप आता कौंदल परिसरात दाखल झाला आहे. तो या परिसरात स्थिरावल्यास मोठा धोका उद्भवणार आहे. कारण, सोमवारी जेथे हत्तींनी नुकसान केले ते शिवार बेळगाव-गोवा महामार्ग आणि खानापूर-नंदगड मार्गापासून जवळ आहे.
वनखाते काय करणार?
हत्तींचा आणखी एक कळप कुठे गेला? याबाबत वनखात्याला सुध्दा माहिती नाही. कौंदलमधील कळप जळगेच्या दिशेने गेल्यास तो त्या भागात स्थिरावण्याची शक्यता अधिक आहे. कारण, या परिसरात मलप्रभेचे मुबलक पाणी उपलब्ध आहे. तसे झाल्यास पुन्हा वनखाते या हत्तींना जेरबंद करण्याची मोहीम राबविणार का? असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. जळगे येथील टस्कराला जेरबंद केल्यानंतर मुख्य वनसंरक्षणाधिकारी मंजुनाथ चव्हाण यांनी या दोन कळपांचाही बंदोबस्त करू, अशी ग्वाही दिली होती. ती केव्हा आमलात आणणार? असाही शेतकऱ्यांचा सवाल आहे.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाचा अपघात नेमका कसा झाला?
समांतर क्रांती / बेळगाव Minister Hebbalkar’s vehicle accident महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला आज मंगळवारी (ता.१४) पहाटे पाचच्या सुमारास अपघात झाला. त्यात मंत्री हेब्बाळकर यांच्यासह त्यांचे भाऊ आमदार चन्नराज हट्टीहोळ्ळी हे जखमी झाले आहेत. मंत्र्यांच्या वाहनापुढे एस्कॉर्ट असते, मग हा अपघात कसा झाला? एस्कॉर्ट करणारे वाहन मंत्र्यांच्या वाहनाच्या पुढे असते. कुत्रा […]