समांतर क्रांती वृत्त
नंदगड: सहा वर्षापूर्वी हलगा (ता.खानापूर) येथील संतोष लक्ष्मण गुरव हे जवान नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झाले होते. त्यावेळी केंद्र आणि राज्य शासनाकडून शहिदाच्या कुटुंबीयांवर आश्वासनांची खैरात करण्यात आली होती. पण, घोषीत झालेली एकही सुविधा त्यांना अजून मिळालेली नाही. रविवारी सहाव्या स्मृतीदिनी शहिदाच्या आई-वडिलांनी शहिद स्मारकासमोर सरकार आणि प्रशासकीय व्यवस्थानाविरोधात आक्रोश व्यक्त केला. सुरूवातीला शहिद जवानाला अभिवादन करण्यात आले. santosh gurav-even-after-six-years-the-family-of-the-martyred-jawan-is-neglected
शासकीय निधी आसुविधा मिळाल्या नसल्यामुळे उभयतांना रोजगार हमीच्या कामावर जाऊन गुजरान करावी लागत आहे. ज्यांनी आपला तरूण मुलगा देशासाठी दिला, त्यांच्यावर अशी वेळ यावी, हे सरकारच्या नाकर्तेपणाचे ज्वलंत उदाहरण आहे. आज हे उभयता आत्मक्लेष म्हणून मुलाच्या स्मृतीदिनी आक्रोश व्यक्त करीत आहेत. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करायला हवी. यासाठी केंद्रीय संरक्षण मंत्र्यांसह अनेकांच्या भेटी घेऊन झाल्या पण सरकार कोणत्याच प्रकारे दखल घेत नसल्याने आश्चर्य वाटत आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते डी.एम.गुरव यांनी व्यक्त केले.
ज्यांनी आपला एकुलता एक पुत्र या देशासाठी दिला, त्यांची ही होणारी परवड, कुचंबणा जिवंतपणी उघड्या डोळ्यांनी पहाणे एवढेच शिल्लक आहे. केंद्र आणि राज्य सरकारने आश्वासनांची पूर्तता करून पिडीत वीर माता-पित्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
चापगावात पुन्हा चोरीचा प्रयत्न
खानापूर: यडोगा रोडवरील रमेश पाटील यांच्या घरातील चोरीची घटना ताजी असतांना पुन्हा चापगावात चोरीचा प्रयत्न उघडकीस आला आहे. प्राथमिक मराठी शाळेमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न काल रविवारी सुट्टीच्या दिवशी अज्ञात समाजकंटकाने केला. तिजोरी पाडून समोरील काच फोडून पुस्तके अस्ताव्यस्त टाकून देण्यात आल्याचा प्रकार आज सोमवारी शाळा सुरू झाल्यानंतर उघडकीस आला. शाळा सुधारणा कमिटी अध्यक्ष मष्णू चोपडे […]