समांतर क्रांती वृत्त
खानापूर: तुम्हाला सर्वसामान्यांना न्याय देता येत नाही. सगळेच हतबल झाले आहेत. म्हणून जे न्यायदान करण्यासाठी झटतात, त्यांना रस्त्यावर उतरावे लागले आहे. लवकरात लवकर बसची समस्या सोडवा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम होतील, असा सज्जड दम माजी आमदार अरविंद पाटील यांनी बस आगार व्यवस्थापकांना दिला. तालुक्यातील बसव्यवस्था विस्कळीत झाल्यामुळे आज शुक्रवारी वकिलांनी रास्तारोको केला. किमान बेळगाव ते खानापूर बस सेवा सुरळीत करा, अशी मागणी वकिल संघटनेच्यावतीने करण्यात आली.
कांही दिवसांपूर्वी बस आगार प्रमुखांना निवेदन सादर करण्यात आले होते. पण, त्यांनी त्याची दखल घेतली नाही. वकिलांनी बेळगाव-खानापूर रस्ता रोखत आंदोलन छेडल्यानंतर पुन्हा त्यांनी बस सेवा सुरळीत करण्याची ग्वाही दिली. निवेदन देऊन पंधरवडा उलटला तरी तुम्ही कांही करू शकला नाही, पुढे काय करणार? असा प्रश्न अध्यक्ष ॲड. आय.आर.घाडी यांनी उपस्थित केला. त्यावर आमच्याकडे कांही नाही, बस वेळापत्रक आणि वाहतूक नियोजन बेळगावमधून होते, असे उत्तर आगारप्रमुखांनी दिले.
एकंदर, रास्तारोकोदरम्यान आगार प्रमुखांनी आश्वासन दिले असले तरी माजी आमदार अरविंद पाटील यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे आंदोलनाची दिशा ठरवावी लागणार आहे. यावेळी वकिल संघटनेचे पदाधिकारी आणि वकिल मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वसामान्यांच्या मागणीला दाद दिली जात नसल्याने वकील रस्त्यावर उतरले. त्यांच्या मागणीची तरी दखल परिवहन खाते घेणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
..तरीही तो संशोधनाकडेच वळला.. संजीव वाटूपकर काय म्हणतात?
चांद्रयान ३ आवकाश झेपावले. त्याच्या उड्डाणासाठीच्या रॉकेटच्या निर्मितीत योगदान दिलेले इस्रोचे वैज्ञानिक आणि अनगडीचे सुपुत्र प्रकाश पेडणेकर यांच्याबद्दल त्यांना विज्ञानाचे बाळकडू पाजणारे त्यांचे शिक्षक तथा कवि-लेखक संजीव वाटूपकर यांनी ‘समांतर क्रांती’कडे व्यक्त केलेले हे मनोगत… श्री प्रकाश नारायण पेडणेकर हा आपल्या मराठा मंडळ कापोली हायस्कूलचा हुशार विद्यार्थी. प्रकाश मुळातच हरहुन्नरी आणि चौकस होता. PUC ची […]