समांतर क्रांती / नंदगड
दुचाकीसह तलावात बुडून माजी ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाल्याची घटना हलशी येथे आज सोमवारी (ता.6) उघडकीस आली. इशांत अंतोन फिगेर (वय 52) असे त्यांचे नाव आहे. घटनेची नोंद नंदगड पोलिसात झाली असून अधिक तपास सुरु आहे.
इशांत हे शनिवारी (ता. 4) हलशीवाडीला गेले होते. रात्री ते हळशीला परतत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते तलावात पडले असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. दोन दिवस ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आज गोठण तलावात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना पदचाऱ्यांना दिसला.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता तो इशांत यांचा असल्याचे निदर्शनास आले. तेथेच तलावात त्यांची दुचाकीही आढळली. इशांत फिगेर यांचा अश्या प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दोड्डहोसूरनजीक अपघात : दुचाकी चालक ठार
समांतर क्रांती / खानापूर भरधाव दुचाकीने झाडाला ठोकारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. सोमवारी (ता. 6) दोड्डहोसूर येथे हा अपघात घडला. यात सावंत नींगप्पा शिंदे (22, नंदीकुर्ली, ता. रायबाग) हा ठार झाला असून अभिषेक नींगप्पा अगसीमणी हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार […]